NABARD  Agrowon
ताज्या बातम्या

NABARD Finance : नाबार्डच्या अर्थसाह्यातून शेतकऱ्यांना नवी दिशा

Agriculture Financing To farmer : डहाणू तालुक्याच्या विकासामध्ये नाबार्ड (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) गेल्या काही वर्षांपासून महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Team Agrowon

Agriculture Credit : डहाणू तालुक्याच्या विकासामध्ये नाबार्ड (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) गेल्या काही वर्षांपासून महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे स्थानिकांसह महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहे. अनेकांना वर्षभर उपजीविकेचे साधन उपलब्ध झाल्याने तालुक्यातून स्थलांतराचे प्रमाण काहीअंशी घटल्याचे सांगण्यात आले.

नाबार्डने गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांना फळबाग, फूलबाग, सेंद्रिय खत, शेततळे उपलब्ध करून दिले आहेत. मत्स्यपालनासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक शिक्षण आणि कृषी क्षेत्रात आर्थिक साह्य दिले. त्यामुळे स्थलांतर काही प्रमाणात घटल्याने त्यांना शेतीशी जोडून नागरिकांचे उत्पन्न वाढवण्यास मदत झाली आहे.

डहाणू तालुक्यातील धानिवरी गावातील शेतकरी वीटभट्ट्या, इमारत बांधकाम आदी कामांसाठी शहरात जाऊन विस्थापित जीवन जगत होते, पण नाबार्ड आणि ल्युपिन फाऊंडेशनने उप्तन्नासाठी फळझाडे देऊन त्यांना विविध उपकरणे दिली. त्यांना विविध मार्गांनी शेतीसाठी प्रोत्साहन दिले.

या शेतकऱ्यांना पाहून गावातील अन्य शेतकरीही पुढे जाऊन शेतीकाम काम करत आहेत. या महिन्यात नाबार्ड जिल्ह्यातील १५ शेतकऱ्यांना नवीन तंत्र शिकण्यासाठी मधमाशी पालनाच्या प्रगत शिक्षणासाठी पंजाब कृषी विद्यापीठात पाठवत आहे.

धानिवरी येथील कामांची नाबार्डचे उपमहाप्रबंधक अनिल रावत, सहायक महाप्रबंधक हितेश बिलिमोरिया, जिल्हा प्रबंधक सुधांशू अश्विनी, लुपिन फाऊंडेशनचे नाजीम पठाण, तसेच शेतकरी यांनी पाहणी केली.

शिलाई कामातून स्वयंरोजगार

महिला सक्षमीकरण आणि उपजीविकेसाठी १०० हून अधिक महिलांना नाबार्डने शिलाई कामाचे प्रशिक्षण दिले. आता या महिला ‘ग्लोबल देसी’ यासारख्या ब्रँडसाठी काम करून महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये कमावत आहेत.

देशभरात वस्तू पाठवण्यास मदत

जिल्ह्यातील बांबू उद्योग आणि आदिवासी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नाबार्डने विक्रमगड बांबू उद्योग उत्पादक कंपनीला ग्रामीण विकास निधीअंतर्गत मदत केली. या कंपनीत २५० महिला भागधारक आहेत.

याअंतर्गत महिलांना बांबूपासून विविध उत्पादने तयार करून, डिझाईन, एक कॉमन फॅसिलिटी सेंटरद्वारे बाजाराशी जोडणे, संकेतस्थळ आदी ई-कॉमर्स पोर्टलशी जोडले जाते आणि देशभर आयोजित केलेल्या प्रदर्शनांत या वस्तू पाठवल्या जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mission Mausam : 'मिशन मौसम'साठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; तर 'डीप ओशन मिशन'साठी तरतूद घटली

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

Union Budget 2026: मोठ्या योजनांची मांडणी, परंतु तरतुदींबाबत साशंकता

Tiger Cub Death: दसोड्याच्या जंगलात वाघिणीच्या शावकाचा मृत्यू

Union Budget: तरुण, महिलांच्या प्रगतीला लागेल हातभार

SCROLL FOR NEXT