Harshvardhan Patil Agrowon
ताज्या बातम्या

Nira Bhima Sugar : ‘नीरा-भीमा’ आर्थिक अडचणीतून सुस्थितीत

Sugar Factory : ‘‘नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचा आर्थिक अडचणीचा काळ आता संपलेला आहे. कारखाना आर्थिकदृष्ट्या सुस्थितीमध्ये आला आहे.

Team Agrowon

Pune News : ‘‘नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचा आर्थिक अडचणीचा काळ आता संपलेला आहे. कारखाना आर्थिकदृष्ट्या सुस्थितीमध्ये आला आहे. कारखाना आर्थिक संकटातून बाहेर आल्याने आगामी काळात नीरा-भीमाचा समावेश राज्यातील टॉप १० कारखान्यांमध्ये निश्‍चितपणे होईल,’’ अशी ग्वाही कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (ता. १३) दिली.

शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची २०२२-२३ ची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या भाग्यरत्न सांस्कृतिक भवनमध्ये झाली. या सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. प्रारंभी कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या १७ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन हर्षवर्धन पाटील यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार होते.

‘‘गतवर्षीच्या हंगामात ५ लाख ६४ हजार ६८२ टन ऊस गाळप केले. साखर उतारा १०.०२ टक्के आला. या हंगामात गाळपक्षमता ३ हजार ५०० टन असताना कारखान्याने एका दिवसात ६ हजार टन ऊस गाळपाचा उच्चांक केला. तर प्रतिदिनी सरासरी ५ हजार २३० टन क्षमतेने गाळप केले. सहवीज निर्मिती प्रकल्पातून २ कोटी ६० लाख १५ हजार ६५५ युनिट वीज निर्यात केली.

इथेनॉलचे ९७ लाख २६ हजार ९२९ लि. उत्पादन निघाले. प्रतिदिनी इथेनॉल उत्पादन सरासरी उत्पादन ६० हजार ६८८ लि. एवढे निघाले. तर बायोगॅस प्रकल्पामुळे ३५७८ मे. टन बगॅसची बचत झाली. सेंद्रिय खत प्रकल्पातून १६ हजार २०७ बॅगांची विक्री केली. बायोकंपोस्ट प्रकल्पातून ५३१५ मे. टन बायो-कंपोस्ट खताची विक्री केली. डिझेल व पेट्रोल पंप विक्रीतून ७ कोटींची उलाढाल झाली आहे. कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट २३ पर्यंतचा पगार झाला. कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोनस दिला जाईल,’’ अशी माहिती पाटील यांनी दिली.

पहिल्या हप्त्याच्या विलंबाबाबत दिलगीर

कारखान्याकडून ऊस बिलाचा दुसरा हप्ता लवकरच अदा केला जाईल. कारखान्याचे भांडवल रु. ६ कोटी एवढे असताना सध्या कारखान्याची मालमत्ता आता ३५२ कोटी रुपयांची झाली आहे. गत हंगामात ऊस बिलाचा पहिला हप्ता देण्यास विलंब झाल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी दिलगिरी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance: यंदाही पीक कापणीवर आधारित विमा योजना

Maharashtra Heatwave Update: कोकण, मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका ठरतोय तापदायक

Fertilizer Management: उत्पादकता वाढीसाठी संतुलित खत व्यवस्थापन गरजेचे : कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाच्या बदलासाठी प्रयत्न करू

DAP Fertilizer Shortage: पेरणीच्या तोंडावर डीएपी खताचा तुटवडा

SCROLL FOR NEXT