Natural Farming
Natural Farming  Agrowon
ताज्या बातम्या

Natural Farming : नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गरज

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः सध्याच्या परिस्थितीत लोकांच्या आरोग्य आणि एकूणच जीवनशैलीत बदल झाला आहे. त्यामुळे संतुलित आहारासाठी (Balanced Food) नैसर्गिक शेतीला (Natural Farming) मोठी संधी आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गरज आहे, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे निवृत्त अधिष्ठाता डॉ. अजितकुमार देशपांडे यांनी व्यक्त केले.

कृषी विज्ञान केंद्रामध्ये किसान सन्मानदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. देशपांडे बोलत होते. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. लालासाहेब रा. तांबडे अध्यक्षस्थानी होते. या वेळी लोकप्रतिनिधी म्हणून भोगावचे उपसरपंच महादेव वाघमारे, सुनील भोसले उपस्थित होते.

शेती व नैसर्गिक शेती यामधील फरक डॉ. देशपांडे यांनी या वेळी विषद केला. श्री. देशपांडे म्हणाले, की भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी गहू व भात पिकांचे संकरित बियाणे संशोधित करण्यात आले. त्या पिकांच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली आणि त्यावेळची ती गरज होती. त्यासाठी रासायनिक खते, किड नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर सुरू झाला. पंरतु त्याचे दुष्परिणाम दिसून आल्याने आता आपणास रसायनमुक्त शेती म्हणजेच सेंद्रिय शेती व पुढे चालून नैसर्गिक शेती करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले.

डॉ. तांबडे यांनी जमिनीच्या आरोग्याकडे अधिक गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. पिकांना आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेमध्ये वर्षानुवर्षे कमतरता होत असल्याने आता खतांवर भरमसाट खर्च करावा लागतो. नैसर्गिक शेतीमध्ये शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा शेतातच तयार करावे अपेक्षित आहे. त्यासाठी लागणारे साहित्य सुद्धा निसर्गनिर्मित असावे. जमिनीचे आरोग्य उत्तम ठेवायचे असल्यास त्यात सेंद्रिय कर्ब वाढले पाहिजेत, असेही ते म्हणाले. विषय विशेषज्ञ प्रदीप गोंजारी यांनी प्रास्ताविक केले. विकास भिसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

जिवामृतसह एनपीकेचे प्रात्यक्षिक

कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेल्या विविध जिवाणू कल्चर प्रात्यक्षिक युनिटची या वेळी शेतकऱ्यांना भेट घडवण्यात आली. तसेच जिवामृत, वेस्टडिकाम्पोजर, एनपीके करावयाचे प्रात्यक्षिकही या वेळी शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT