Agrowon Sanvad Agrowon
ताज्या बातम्या

Chili Production : मिरची उत्पादनात सातत्य ठेवण्याची गरज

Chili Crop : मिरची पीक तीनही हंगामात घेता येते. फक्त अशा पद्धतीने पीक घेताना क्षेत्र पालट करणे आवश्यक आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मिरची पीक तीनही हंगामात घेता येते. फक्त अशा पद्धतीने पीक घेताना क्षेत्र पालट करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन शास्त्रीय पद्धतीने मिरची पीक उत्पादनात सातत्य ठेवण्याची गरज कृषी शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवन-सकाळ व कोरोमंडल यांच्या संयुक्त विद्यमाने आमठाणा (ता. सिल्लोड) येथे शुक्रवारी (ता. २१) आयोजित ॲग्रोवन संवाद कार्यक्रमात मिरची लागवड व व्यवस्थापन तंत्रज्ञान या विषयावर डॉ. पाटील मार्गदर्शन करीत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी श्रीराम डफळ तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे कोरोमंडलचे विभागीय कृषी विद्यावेत्ता डॉ. विनेश रेगे, कोरोमंडलचे विभागीय व्यवस्थापक वैभव राठी, कोरोमंडलचे मार्केटिंग मॅनेजर अमित जैन, ॲग्रोवन साहाय्यक वितरण व्यवस्थापक अजित वाणी आदींची उपस्थिती होती.

डॉ. पाटील म्हणाले, की मिरची पिकातील घटक लक्षात घेता त्याचे खाण्यासोबतच औषधीय गुणधर्मही पुढे येतात. मिरचीचे क्लस्टर निर्माण झाले आहे. उत्पादकता मात्र सरासरी आठ ते दहा टन एकरी यापुढे नाही. प्रत्यक्षात प्रगत देशात मिरचीची उत्पादकता ३५ ते ४० टन एकरी आहे. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी आपल्याला संधी असून त्यासाठी व्यवस्थापनातील दोष दूर करणे आवश्यक आहे.

प्रकाश संश्लेषणामुळे अनेक कीड रोगांना नियंत्रित करता येतं. त्यासाठी शिफारशीत अंतरावरच मिरची लागवड करावी. एकाच क्षेत्रात मिरची लागवड करावी लागत असल्यास जमिनीची निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. मिरची पिकाचे क्षेत्रात ऑक्सिजन विपुल राहील यासाठी विशेष काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.

कोरोमंडलचे श्री राठी यांनी कंपनीची वाटचाल, विविध उत्पादने व खत खरेदी पुरवठा यासाठी आवश्यक कृतीवर प्रकाश टाकला. कोरोमंडलचे डॉ. रेगे यांनी कोरोमंडलकडून खास मिरची पिकासाठी तयार केलेली खते, खते देताना माती परीक्षणाचे महत्त्व, सेंद्रिय कर्बाचे महत्त्व, खत व्यवस्थापन नेमके कसे असावे याची सखोल माहिती दिली.

चर्चासत्राचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲग्रोवनचे प्रतिनिधी संतोष मुंढे यांनी तर आभार ॲग्रोवनचे वितरण प्रतिनिधी सुनील दाभाडे यांनी मानले. चर्चासत्राला मिरची उत्पादकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी कोरोमंडलच्या सहकाऱ्यांसह सकाळ बातमीदार कृष्णा सोमासे यांनी परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘ते’ पुन्हा आले!

Vidhansabha Election 2024 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महायुतीचाच प्रभाव

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT