Nana Patole agrowon
ताज्या बातम्या

Nana Patole : 'सरकारवर शेतकरी, गरीब जनतेचा विश्वासच राहिला नाही'

Maharashtra Monsoon Session : कृषीप्रधान राज्यात शेतकरी व गरिबांच्या आत्महत्या वाढल्याचे सांगत नाना पटोले यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

Team Agrowon

Maharashtra News : राज्यातील शेतकऱ्यावर संकटाचे आभाळ कोसळले आहे पण राज्य सरकारची मदत काही पोहचत नाही. राज्य सरकार केवळ घोषणा करते त्याची अंमलबजावणी होत नाही. मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मदत अजून मिळालेली नाही, त्याचा सर्वेही केलेला नाही.

अशी जोरदार टीका काँग्रेसनेते नाना पटोले यांनी केली. राज्य सरकारच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे यावेळी ते बोलत होते.

पटोले पुढे म्हणाले की, सरकारकडे तलाठी, कृषी सहाय्यक ही यंत्रणा नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारने तातडीने सरसकट मदत द्यावी. पावसामुळे लाखो होक्टर शेती पाण्याखाली गेली आहे तर लोकांच्या घरात पाणी शिरले आहे, अन्नधान्य वाया गेला आहे, लोक उपाशी आहेत असे सांगत पटोले यांनी लक्ष वेधले.

शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या डोळ्यातले अश्रु थांबत नाहीत. कृषीप्रधान राज्यात शेतकरी व गरिबांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. हा विषय राजकारण करण्याचा नाही, ज्यांचे- ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारकडून भरीव मदत दिली पाहिजे.

सरकार कोट्यवधी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मंजूर करुन घेते मग शेतकऱ्यांना मदत का होत नाही. शेतकऱ्यांचा, सर्व सामान्य जनतेचा या सरकारवर विश्वासच राहिलेला नाही, हा विश्वास पुन्हा मिळवण्याची गरज आहे.

अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत असे मंत्री सांगतात पण प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. एक रुपयात वीमा अशी सरकारने घोषणा केली आहे, त्याबाबतचे निवेदनही होणे गरजेचे आहे. मदतीसंदर्भात सरकारची भूमिका सुस्पष्ट असायला हवी अशी कांग्रेसची भूमिका आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2026 : पावसाची तूट, पेरणीला फटका; कापूस आणि सोयाबीन लागवड पिछाडीवर

Goat Farming: शेळीपालनातून मिळविले आर्थिक स्थैर्य

Farmer Success Story: गावरान लसूण उत्पादनातून मिळविली वेगळी ओळख

Environmental Conservation: वृत्तांत उप्पुगल गाव भेटीचा!

MGNREGA: ‘राम’भरोशावर रोजगार!

SCROLL FOR NEXT