Yavtmal APMC Election Agrowon
ताज्या बातम्या

APMC Election : बाजार समितीच्या मतदार यादीतून नावे वगळली

पुणे बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदार याद्या सादर करण्याचे आदेश सहकर निवडणूक प्राधिकरणाने बाजार समिती प्रशासनाला दिले होते.

Team Agrowon

पुणे : पुणे बाजार समितीची निवडणूक (Pune APMC Election) जाहीर झाल्यानंतर तयार केलेल्या मतदार याद्या इच्छुकांच्या हाती पडल्या आहेत. यामध्ये काही अधिकाऱ्यांना हाताशी धरत नावे वगळली असून, इच्छुकांना निवडणुकीपासून (APMC Election) रोखण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश शिर्के यांनी केला आहे.

पुणे बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदार याद्या (Voter List) सादर करण्याचे आदेश सहकर निवडणूक प्राधिकरणाने बाजार समिती प्रशासनाला दिले होते. त्यानुसार सहकार निवडणूक प्राधिकरणाला मतदार याद्या नुकत्याच सादर केल्या.

बाजार समिती निवडणुकीसाठी दोन व्यापारी प्रतिनिधींसाठी आडते आणि खरेदीदार परवानाधारक मतदान करू शकणार आहेत; मात्र, बाजार समितीने मतदार याद्या निवडणूक प्राधिकरणाला सादर करताना, काही इच्छुकांनी मतदार यादी तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत हस्तक्षेप केल्याचा संशय आहे.

न्यायालयात दाद मागणार

बाजार समितीत तरकारी विभागात माझा स्वतःचा वडिलोपार्जित गाळा आहे. वडिलांनी बडदे आणि तापकीर यांच्याशी व्यवसायात भागीदारी केली होती. ही भागीदारी अनुक्रमे २००४ आणि २०१० मध्ये संपुष्टात आली.

त्याबाबत भागीदारी विसर्जन पत्र जमा केले होते. त्यांनतर समितीने मला २०१५ ते २०१९ या कालावधीपर्यंत अडत्या ‘अ वर्ग’ परवाना दिला. भागीदारी, भागीदारी तोडपत्र सर्व कागदपत्रे जमा आहेत; मात्र, भागीदारीचे कारण देत समितीने वारस नोंद न करता, अलीकडच्या काळाता परवाना देणे बंद केले.

बाजार समितीने निवडणुकीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला सादर केलेल्या यादीत माझे नाव वगळले आहे. तर, काही इच्छुक उमेदवारांकडे मतदार यादी आधीच पोहोच झाली असून त्या यादीनुसार प्रचार तयारी सुरू झाल्याचे दिसून येते.

या सर्व प्रकारात काही अधिकारी दबावाखाली काम करत असल्याचा संशय आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेतून बाहेर ठेवण्याची गरज आहे. याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडेही न्याय मागण्यात येणार असून, प्रसंगी न्यायालयाकडे दाद मागणार आहे, असे शिर्के यांनी सांगितले.

‘संबधित प्रकरण तपासले आहे. त्यांनी वारस नोंद केलेली नाही. त्यांनी यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करून घेणे अपेक्षित होती. त्यांच्या पूर्वीच्या भागीदाराचे आक्षेप अद्याप रेकॉर्डवर आहेत.

- मधुकांत गरड, प्रशासक, बाजार समिती, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Food Processing Industry : ‘माऊली’ ब्रॅंड उत्पादनांचा होतोय विस्तार

Mango Orchard Management : आंबा मोहोरताना घ्यावयाची काळजी

Postal Votes : पोस्टल मतांनी पटोलेंना तारले

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

SCROLL FOR NEXT