Sharad Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Sharad Pawar : ‘रयत’च्या पाठीशी नगरकरांचा मजबूत पाठिंबा : शरद पवार

चार लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या ‘रयत’ला नगर जिल्ह्यातील लोकांचा मजबूत पाठिंबा आहे. अशाच पाठिंब्याने ज्ञानदानाची दालने रयतच्या माध्यमातून खुली झाली असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

टीम ॲग्रोवन

नगर : गावातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाचा योग्य ट्रॅक मिळावा, हाच दृष्टिकोन रयत शिक्षण संस्थेने (Rayat Educational Institute) कायम ठेवला आहे. चार लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या ‘रयत’ला नगर जिल्ह्यातील लोकांचा मजबूत पाठिंबा आहे. अशाच पाठिंब्याने ज्ञानदानाची दालने रयतच्या माध्यमातून खुली झाली असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील कोळाईदेवी विद्यालयाने उभारलेल्या नव्या इमारतीचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १६) झाले. अध्यक्षस्थानी डॉ. अनिल पाटील (Dr. Anil Patil) होते.

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप व नीलेश लंके, राहुल जगताप, माजी प्राचार्य एस. एस. लगड उपस्थित होते. पवार म्हणाले, की राज्यात लोकसंख्या वाढत असून, त्या तुलनेत शेती कमी होते आहे, हा विरोधाभास आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेगळे पर्याय स्वीकारले पाहिजेत. त्यादृष्टीनेच रयत संस्थेकडून आधुनिक उपक्रम राबविले जात आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या मुलांना पर्याय देत आहे. वळसे पाटील म्हणाले, की कर्मवीर अण्णांनी रयतची उभारणी करून सामान्यांच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. या मुलांना आधुनिक शिक्षणाची गरज असताना शरद पवार यांच्यासारखे नेते ते शिक्षण देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.

‘सहकार चळवळ सामान्यांची शक्ती’

शरद पवार म्हणाले, ‘‘मोठ्या बँकेत लंगोटी घालून गेलेल्या माणसाला सन्मान मिळत नाही. तेथे फक्त सुटाबुटातील व्यक्तीलाच सन्मान मिळतो. त्यामुळे सहकारी बँका व पतसंस्थांचाच सामान्यांना आधार आहे. लोकांच्या जिवावर उभी राहिलेली सहकारी चळवळ गावातील सामान्यांची शक्ती आहे. केंद्र सरकार सहकार क्षेत्रात नवा कायदा आणत आहे. काही गोष्टी चांगल्या असल्या, तरी अनेक ठिकाणी शंका आहेत. त्यात गावातील सहकारी संस्थेला रुग्णालये काढावी लागणार आहेत. गावची सोसायटी असे रुग्णालय काढू शकेल का, त्यासाठी लागणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कसे उपलब्ध करणार, हे प्रश्‍न आहेत. त्यातच जर त्या रुग्णालयात रुग्णाच्या बाबतीत काही घटना घडली, तर गाव टोकाची भूमिका घेऊ शकते, अशी भीती वाटते,’’ असेही पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: सौरऊर्जेतून घरगुती, कृषीला शाश्‍वत वीजपुरवठा

Solar Agriculture Pump: सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी रखडपट्टीच

Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली

Tomato Late Blight: टोमॅटो पिकावरील उशिराने येणारा करपा नियंत्रणाचे सोपे उपाय

Nanded Degloor Expressway: नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मिळणार गती

SCROLL FOR NEXT