Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : जोरदार पावसामुळे ‘मुळा, सीना’ला पूर

‘मुळा’तून विसर्ग वाढवला; पिकांचे नुकसान सुरूच

टीम ॲग्रोवन

नगर : नगर, नेवासा, राहुरी, शेवगाव, पारनेर तालुक्यांत गुरुवारी (ता.२०) जोरदार पाऊस (Heavy Rainfall) झाला. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने (Dam Intake Increased) मुळातून विसर्ग वाढविला आहे. त्यामुळे मुळा नदीला (Mula River) पूर आला. नगर तालुक्यातील पूर्व भागात झालेल्या जोरदार पावसामुळे सीना नदीलाही (Cena River) पूर आला आहे. सीना धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान (Crop Damage) वाढतच आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जोरदार पाऊस पडत आहे. घाटशीळ पारगाव वगळता जिल्ह्यातील इतर सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे जसा पाऊस होऊन धरणात पाण्याची आवक होईल, तसा धरणातून विसर्ग ही वाढवला जात आहे. गुरुवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह नगर, नेवासा, राहुरी, शेवगाव, पारनेर, कोपरगाव तालुक्यांतील काही भागांत जोरदार पाऊस झाला. गुरुवारी सकाळी दहा वाजता मुळा धरणातून दहा हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता.

सीना नदीला पूर आल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत होती. सांडव्यावरून २७२१ क्युसेक पाणी बाहेर पडत होते. ओझर बंधाऱ्यातूनही साडेचार हजार क्युसेकने पाणी सोडले जात होते.

प्रशासनाच्या नोंदीनुसार नागापूर, सोनई, ब्राह्मणी, कोपरगाव, रेणवडे, सुरेगाव, दहिगाव, पोहेगाव, लोणी, राहाता, साकूर या महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. इतर महसूल मंडलांतही पाऊस झाला.

कोपरगाव तालुक्यात अतिवृष्टी

कोपरगाव तालुक्यातील पाचही महसूल मंडलांत अतिवृष्टी झाल्याने मोठे नुकसान झाले. कांदा व्यापाऱ्यांच्या चाळीत पाणी घुसल्यामुळे कांद्याची मोठी हानी झाली आहे. इतर पिकांनाही तीव्र फटका बसला आहे. कोपरगावला ९१, रेणवडे ९२, सुरेगाव ९१, दहिगाव ६७ व पोहेगाव येथे ६५ मिलिमीटर पाऊस झाला. या भागांत अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr Panjabrao Deshmukh Memorial Award: डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार मुख्यमंत्र्यांना जाहीर

Kharif Onion Cultivation: लेट खरीप कांद्याची लागवड यंदा अडीच लाख हजार हेक्टरवर

APMC Reforms: ‘बाजार व्यवस्थेवर आता सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण’

Yashwant Factory Land Scam: ‘यशवंत’च्या जमीन खरेदी-विक्रीला स्थगिती

Market Committee Democracy: पणनमंत्र्यांकडील अध्यक्षपद बाजार समित्यांच्या मुळावर: राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT