ST buses Update agrowon
ताज्या बातम्या

ST buses Update : एसटीच्या मोफत प्रवास योजनेतून 'या' घटकांना वगळले, ST प्रशासनाचा निर्णय

ST Bus News : एसटीमधून प्रवास करणाऱ्या वयाची 75 वर्षं पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची घोषणा केली होती. पण आता एसटी प्रवाशांनी एक पत्र काढून या योजनेसाठी काही नियम अटी लागू करून काहींना या योजनेतून वगळले आहे.

Team Agrowon

Senior Citizen : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य परिवहन सेवेच्या बसमध्ये 75 वर्षं पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना विनामुल्य, तर महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र, आता एसटी प्रशासनाने आजारी व्यक्तींचा मोफत प्रवासाची सवलत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना पूर्वी एसटीमध्ये तिकिटात 50 टक्के सवलत देण्यात येत होती. परंतु गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये बदल करून एसटी बसचा प्रवास पूर्णपणे मोफत करण्याची घोषणा केली होती. या योजनेचा अनेक जण लाभ घेत आहेत. पण सरकारच्या योजनेमध्ये काही बदल केले आहेत. तसेच महिलांना अर्ध्या तिकिटाची सवलत देण्यात येते. तसेच सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्ण आदींना विनामुल्य प्रवास सवलत देण्यात आली होती.

एसटी महामंडळ विविध 29 समाजघटकांना प्रवासात सवलत देत असते. याची भरपाई राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन करीत असते. एसटीच्या या सवलत योजनेमुळे नागरिकांना प्रचंड फायदा झाला आहे. तसेच महामंडळाचे प्रवाशांमध्येही वाढ झाली आहे. पण आता एसटी प्रशासनाकडून नवे परिपत्रक काढण्यात आले आहे.

आता आजारी लोकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या निमआराम किंवा आराम या बस सेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही. सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना एसटीच्या केवळ साध्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या दुर्धर आजारी व्यक्तींना एसटीच्या निमआराम हिरकणी, वातानुकूलित अश्वमेध, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बसमधून सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाचे महाव्यवस्थापकांनी दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT