Monsoon Update  Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Update : मॉन्सून निघणार परतीच्या प्रवासावर

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाचा मुहूर्त यंदा देखील काहीसा लांबला आहे. मात्र आता माघारीसाठी पोषक वातावरण झाले आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (Monsoon Rain) (मॉन्सून) वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाचा (Monsoon Return Journey) मुहूर्त यंदा देखील काहीसा लांबला आहे. मात्र आता माघारीसाठी पोषक वातावरण (Favorable Climate Condition) झाले आहे. त्यामुळे दोन दिवसांत मॉन्सून राजस्थानातून परतीच्या प्रवासाला निघण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

१७ सप्टेंबर परतीची दीर्घकालीन तारीख

परतीसाठी पोषक हवामान तयार झाल्याने यंदा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानातून मॉन्सून माघारी फिरण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र वायव्य भारतात पाऊस सुरू राहण्यासाठी पोषक प्रणाली तयार झाल्याने मॉन्सूनचा परतीचा प्रवास सर्वसाधारण वेळेपेक्षा लांबला आहे. १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख आहे.

वायव्य भारतात केंद्रभागी हवेचा अधिक दाब असलेली प्रणाली तयार झाली आहे. पश्चिम राजस्थान, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली या भागात पुढील पाच दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती पोषक असल्याने पुढील दोन दिवसांत वायव्य भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. गतवर्षी ६ ऑक्टोबर रोजी राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू केलेल्या मॉन्सून २५ ऑक्टोबर रोजी देशातून परतल्याने दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara DCC Bank Election : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आठ ठराव रद्द

Cattle Feed Shortage : अहिल्यानगर जिल्ह्यात चार महिने पुरेल एवढाच चारा उपलब्ध

Yavatmal Drought : अन्यथा नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही

Cotton Pink Bollworm: गुलाबी बोंड अळीचा कापसावर वाढता धोका

Loan Waiver Scheme : कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या यादीत ४० हजार शेतकऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT