Maharashtra
Maharashtra Agrowon
ताज्या बातम्या

पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून : कालावधीवरून सरकार, विरोधकांत मतभेद

Team Agrowon

शिंदे सरकारचे (Eknath Shinde) पहिले पावसाळी अधिवेशन बुधवारपासून (ता.१७) मुंबई येथे सुरु होणार आहे. १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. १६ तारखेला याबाबत विरोधकांची रणनीती ठरणार आहे.

मुंबईतील विधानभवनात आज विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (rahul narvekar) ,विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (narhari zirval) , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) , राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादा भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

१७ ते २५ ऑगस्ट २०२२ या दरम्यान अधिवेशन होणार असून १९ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि २०, २१ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. दिनांक २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद व विधानसभा बैठकांची तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.

दानवेंच्या निवडीवर काँग्रेसचा आक्षेप

शिवसेनेचे औरंगाबादचे आमदार अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आलीय. त्याला महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला. विधानपरिषद विरोधी पक्षनेता आम्हालाच मिळाला पाहिजे, दुर्दैवाने शिवसेनेने नेता निवडण्यापूर्वी आमच्याकडे साधी विचारणाही केली नसल्याचे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, आज काँग्रेसचे नेते शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) आहे तर विधानसभेमध्ये उपसभापतीपद शिवसेनेकडे (Shivsena) आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पद हे आम्हाला मिळाला पाहिजे, असा आग्रह थोरात यांनी धरला. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही दानवेंच्या नियुक्तीबद्दल नाराजी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT