Monsoon Update Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Update : मॉन्सून उद्या देशाचा निरोप घेण्याचे संकेत

मॉन्सूनने यंदा २० सप्टेंबर रोजी राजस्थान आणि कच्छच्या भागातून परतीचा प्रवास सुरू केला. परतीच्या प्रवासात मॉन्सूनची वाटचाल अडखळत सुरू आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास (Monsoon Return Journey) आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. गुरूवारी (ता. २०) देशाच्या बहुतांशी भागातून मॉन्सून परतलेल्या मॉन्सूनने (Monsoon Update) शुक्रवारी (ता.२१) संपूर्ण छत्तीसगड, आडिशा, विदर्भाच्या बहुतांश भागासह आंध्र प्रदेशच्या काही भागातून काढता पाय घेतल्याचे हवामान विभागाने (Weather Department) जाहीर केले आहे. उद्यापर्यंत (ता.२३) मॉन्सून संपूर्ण देशाचा निरोप घेण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

मॉन्सूनने यंदा २० सप्टेंबर रोजी राजस्थान आणि कच्छच्या भागातून परतीचा प्रवास सुरू केला. परतीच्या प्रवासात मॉन्सूनची वाटचाल अडखळत सुरू आहे. तब्बल महिनाभर वाटचाल केल्यानंतर गुरूवारी (ता. २०) मॉन्सूनने संपूर्ण झारखंड, पश्चिम बंगाल, ईशान्य भारतातील राज्य, ओडिशाच्या बहुतांशी भाग, विदर्भ, छत्तीसगडच्या आणखी काही भागातून माघार घेत बहतांशी देशातून माघार घेतली.

शुक्रवारी (ता. २०) परतीची वाटचाल सुरू ठेवत मॉन्सूनने शुक्रवारी (ता.२१) संपूर्ण छत्तीसगड, आडिशा, विदर्भाच्या बहुतांश भागासह आंध्र प्रदेशाच्या काही भागातून मुक्काम हलवला आहे. डहाणू, बुलढाणा, काकीनाडा, रामगुंडम पर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला आहे. रविवार (ता. २३) पर्यंतच्या २४ तासांत मॉन्सून संपूर्ण देशाचा निरोप घेण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

Water Storage: देशातील मोठी ४० टक्के धरणे निम्मी रिकामी, महाराष्ट्रात किती पाणीसाठा?

Unseasonal Rain Damage: धाराशिव जिल्ह्यात दीड हजार हेक्टरला पूर्वमोसमीचा फटका

Farmers Agitation: अन्नत्यागातून शेतकऱ्यांप्रति सहवेदना

Paddy Disease: धान पिकावर करपा रोग

SCROLL FOR NEXT