Monsoon Update
Monsoon Update Agrowon
ताज्या बातम्या

राज्यात विविध भागांत मॉन्सून सक्रिय

टीम ॲग्रोवन

पुणे : मॉन्सून सक्रिय (Monsoon Active) होत असल्याने राज्याच्या विविध भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) पडला. मध्य महाराष्ट्र आणि मराठड्यातही पावसाने हजेरी (Rainfall) लावली आहे. मॉन्सूनच्या पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड येथे सर्वाधिक ११६ मिलिमीटर, मालवण येथे ८२ मिलिमीटर पाऊस पडला. तर पालघर येथेही ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतही संततधार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील नगर, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या.

चंद्रपूरच्या गोंडपिंपरीत ६० मि.मी.ची नोंद

विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर या जिल्ह्यांत सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. चंद्रपूरच्या गोंडपिंपरी येथे ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, लातूर जिल्ह्यांतही अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली.

बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

पालघर : पालघर ९३, वसई ४५.

रायगड : म्हसळा ५०, मुरूड ४६, श्रीवर्धन ४७.

रत्नागिरी : गुहागर ४७, लांजा ४३, राजापूर ५९, रत्नागिरी ३८.

सिंधुदुर्ग : देवगड ११६, मालवण ८२.

मध्य महाराष्ट्र :

नगर : राहुरी ४२,

जळगाव : अंमळनेर २९.

कोल्हापूर : गगनबावडा २४.

सातारा : महाबळेश्‍वर २०.

सोलापर : सेालापूर ५२.

मराठवाडा :

बीड : अंबाजोगाई २३.

हिंगोली : हिंगोली २३, कळमनुरी ५८, वसमत २९.

जालना : मंथा ८५.

लातूर : शिरूर अनंतपाळ २९.

नांदेड : धर्माबाद २०, हिमायतनगर ५४, किनवट ३२, मुदखेड ४९. नांदेड २६.

परभणी : जिंतूर ४५, परभणी ३०, पूर्णा ३१.

विदर्भ :

अमरावती : धामणगाव रेल्वे ३५, तिवसा २९.

भंडारा : लाखंदूर २२.

बुलडाणा : चिखली २०, देऊळगाव राजा २९.

चंद्रपूर : ब्रह्मपुरी २९, गोंडपिंपरी ६०, जेवती ३९, मूल २१, नागभिड २३, सावळी २४, सिंदेवाही ३४.

नागपूर : भिवापूर २७.

वर्धा : आर्वी ३१, देवळी ३२, वर्धा २२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT