Randhir Savarkar Agrowon
ताज्या बातम्या

POCRA : आमदार रणधीर सावरकर पुन्हा पोखराच्या तज्ज्ञ सल्लागार समितीवर

भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा अकोला जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांची नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या (पोखरा) समितीवर तज्ज्ञ सल्लागार म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा अकोला जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर (MLA Randhir Savarkar) यांची नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या (पोखरा) (POCRA) समितीवर तज्ज्ञ सल्लागार म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून राज्यातील १५ जिल्ह्यांतील पाच हजारांवर गावांमध्ये पोखरा प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. अकोला, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यात विस्तारलेल्या खारपाण पट्ट्यातील समस्या निकाली काढण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ही समिती काम करीत असते.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी तांत्रिक सल्लागार समिती सदस्य म्हणून आमदारसावरकर यांच्याकडे जबाबदारी दिली होती. आता सत्ता बदल झाल्यानंतर पुन्हा आमदार सावरकर यांना या समितीवर नेमण्यात आले आहे.

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्यात या प्रकल्पाची अंमलबजावणीची गती संथ आहे. निधी कमी प्रमाणात खर्च झालेला आहे. त्यामुळे स्वतःच्या जिल्ह्यापासून प्रकल्पाची गती वाढवण्याचे आव्हान आ. सावरकरांना पेलावे लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture University : कृषी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळ वाऱ्यावर

Kharif Sowing : खेड तालुक्यात खरिपाच्या ६७ टक्के पेरण्या

Rain Alert Maharashtra : विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT