Nilesh Lanke Agrowon
ताज्या बातम्या

Nilesh Lanke : रस्ते झाल्याशिवाय हटणार नाही

नगर -पाथर्डी-शेवगाव, नगर -राहुरी- कोपरगाव व नगर-मिरजगाव ते चापडगाव टेंभुर्णी रस्त्याचे काम झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार आमदार नीलेश लंके यांनी केला. विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

टीम ॲग्रोवन

नगर ः नगर -पाथर्डी-शेवगाव, नगर -राहुरी- कोपरगाव व नगर-मिरजगाव ते चापडगाव टेंभुर्णी रस्त्याचे काम झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केला. विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

नगर जिल्ह्यातील नगर- शिर्डी, नगर-पाथर्डी यासह इतर रस्त्यांची कामे (Road Work) गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत. खराब रस्त्यामुळे (Damaged Road) अनेकांचे अपघातात (Road Accident) बळी गेलेले आहेत. प्रशासन या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याने पारनेरचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (ता. ७) उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज (गुरुवारी) दुसरा दिवस आहे. उपोषणाला आमदार प्राजक्ता तनपुरे, आमदार दादा कळमकर यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.

नगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. त्यात अनेक अपघात होऊन लोकांचे बळी गेले आहेत. या महामार्गाचे काम झाले नाही म्हणून संतप्त झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसह नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लंके यांनी उपोषण सुरू केले आहे.

आमदार लंके म्हणाले, ‘‘तिन्ही रस्त्यांच्या संदर्भात मी तीन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. संबंधित खात्याला ३८ पत्रे दिली. मात्र त्यांचे आतापर्यंत एकही ठोस उत्तर मिळाले नाही. या रस्त्यांमुळे अपघातात ज्यांचा बळी गेला त्याला कोण जबाबदार आहे? जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाही. एक तर रस्ते होतील, नाही तर आम्ही या ठिकाणी असेच बसून राहू. जे होईल त्याला हे प्रशासन जबाबदार राहील.’’

या आंदोलनाच्या स्थळी क्रांतिकारी शेतकरी पक्ष, शहर जिल्हा काँग्रेस वंचित बहुजन आघाडी पाथर्डी, बार असोसिएशन, त्रिदल सैनिक संघटना, नगर बार असोसिएशन, फुले ब्रिगेड, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, शेतकरी विकास मंडळ आदी विविध संघटनांनी नीलेश लंके यांनी सुरू केलेल्या या आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला.

नगर- कोपरगाव रस्त्याच्या कामाचा ठेकेदार राष्ट्रवादी काँग्रेसने पळून लावला, असा आरोप खासदार विखे यांनी केला होता. हा आरोप त्यांनी सिद्ध केला, तर मी आणि प्राजक्त तनपुरे आमदारकीचे राजीनामे देऊ.
नीलेश लंके, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Water Budgeting: समृद्ध गावशिवारासाठी पाण्याचा ताळेबंद

FPO Success Story: विविध उपक्रमांमधून ‘सातबारा’ कंपनीची आश्‍वासक वाटचाल

Post Harvest Management: काढणीपश्चात तंत्रज्ञानाची सद्यःस्थिती अन् आव्हाने

Spice Business Success: बीटेक पदवीधराचा ‘अष्टगुण मसाले’ ब्रॅंड

Mushrooms Health Benefits: पोषणमूल्ययुक्त आरोग्यदायी अळिंबी

SCROLL FOR NEXT