Vidhansabha Agrowon
ताज्या बातम्या

MLA Disqualification : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल पुन्हा लांबणीवर, आता मिळाली 'ही' तारीख

Shivsena Crisis : आमदार अपात्रतेसंदर्भातील आज विधानसभेत सुनावणी सुरू झाली. परंतु विधानसभा अध्यक्षांनी पुढील सुनावणीसाठी दोन आठवड्यांची तारीख दिली आहे. दरम्यान, अपात्रतेबाबत निर्णय देण्यासाठी वेळ काढूपणा केला जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून (ठाकरे गट) करण्यात आला आहे.

Swapnil Shinde

Thackeray Vs Shinde : शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह १७ आमदारांच्या अपात्रतेवर आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी सुरू झाली. दरम्यान, शिंदे गटाकडून याचिकेची प्रत न मिळाल्याने युक्तिवाद करण्यास अडचण येत असल्याचे म्हटले. त्यावर नार्वेकर यांनी शिंदे गटाला कागदपत्रे देण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.

शिवसेनेतील बंडानंतर विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदारांच्या १७ आमदारांच्या अपात्रते संदर्भात महत्त्वाची सुनावणी आजपासून सुरू झाली. या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांसमोर ४१ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सुनावणीसाठी ठाकरे गटाचे सर्व आमदार हजर होते. तर शिंदे गटाच्या ४० आमदारांपैकी फक्त २१ आमदार उपस्थित होते. शिंदे गटाकडून निहाल ठाकरे तर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला.

यावेळी ठाकरे गटाकडून सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्याची विनंती केली. यावर शिंदे गटाकडून याचिकेची प्रतच मिळाली नसल्याने युक्तीवाद करण्यात अडचण येत असल्याचे सांगितले. यावरुन विधानसभा अध्यक्षांनी कागदपत्रे देण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT