Gokul Dudh News : सध्या गोकुळसमोर अमूलचे आव्हान असले तरी, परराज्यांतील ब्रँडचे आक्रमण थोपविण्याची ताकद कोल्हापूरच्या दूध उत्पादकांत व गोकुळमध्ये आहे. तर गुणवत्तेमुळे गोकुळने मुंबईच्या बाजारपेठेत आपले स्थान कायम ठेवले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. गोकुळच्या नवी मुंबईतील वाशी येथील विस्तारीकरण व नवीन दुग्धशाळेचे उद्घाटन ना. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
आ. सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले की, या विस्तारीकरणामुळे गोकुळच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. सध्या १४ लाख लिटरहून अधिक दुधाची विक्री होते. भविष्यात ती वीस लाख लिटरपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.
यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले की, 'गोकुळ' महाराष्ट्राचा बँड व्हावा, यासाठी गेली अनेक वर्षे आम्ही प्रयत्नशील आहोत. अमूलला टक्कर देण्याची क्षमता फक्त गोकुळमध्ये आहे.
मुंबईत आणखी १० लाख लिटर दूध विक्री होऊ शकते. मुंबईतील दुग्धशाळेमुळे १२ लाखांपर्यंत पॅकेजिंग क्षमता उपलब्ध झाली असल्याचे आमदार पाटील यांनी दिले.
वर्षाला होणार 12 कोटींची बचत
विस्तारीकरणामुळे पॅकिंगसाठी प्रतिलिटर १ रुपये ३९ पैशाची कायमस्वरूपी बचत होणार आहे, त्यामुळे गोकुळची वर्षाला १२ कोटींची बचत होणार असल्याचे गोकुळचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले.
यावेळी गोकुळचे संचालक विश्वास पाटील, अभिजीत तायशेटे, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, नवी मुंबई (वाशी) व्यवस्थापक दयानंद पाटील आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.