Nashik Winter Agrowon
ताज्या बातम्या

Nashik Winter : नाशिकचा पारा १२ अंशांवर

मॉन्सून परतल्यानंतर गेल्‍या आठवड्याभरापासून वातावरणात बदल झाला असून, गारवा वाढला आहे. दिवसा कडक ऊन तर सायंकाळनंतर वातावरणात गारवा जाणवत आहे.

टीम ॲग्रोवन

नाशिक : दिवाळीनंतर तापमानात घट (Temperature) होत असल्याने थंडीची (Winter) हुडहुडी वाढली आहे. जिल्ह्यात चालू वर्षीच्या थंडीत सर्वांत नीचांकी तापमान (Lowest Temperature) निफाड गहू संशोधन केंद्र येथे सोमवारी (ता. ३१) १२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे एकीकडे दिवसा तापमान कायम असून रात्री तापमानात घसरण होत असल्याचे पाहायला मिळाले.

मॉन्सून परतल्यानंतर गेल्‍या आठवड्याभरापासून वातावरणात बदल झाला असून, गारवा वाढला आहे. दिवसा कडक ऊन तर सायंकाळनंतर वातावरणात गारवा जाणवत आहे.

२२ ऑक्टोबरपर्यंत तापमान २० अंश सेल्सिअसवर होते; मात्र त्यानंतर तापमानात घसरण होत आहे. १२ ऑक्टोबर रोजी १२.६ इतके सुरुवातीला तापमान कमी झाले होते; मात्र त्यानंतर पुन्हा त्यात वाढ झाली. तर ऑक्टोबरअखेर तापमानाचा पारा थेट १२ अंशांवर घसरला.

गत सप्ताहात ऑक्टोबर महिन्यातील तापमान स्थिती

(अंश सेल्सिअस)

तारीख....कमाल...किमान

३१ ऑक्टो...३१.१...१२

३०ऑक्टो...३२...१२.२

२९ऑक्टो...३०.६...१२.४

२८ ऑक्टो...३१.४...१४.४

२७ ऑक्टो...३१.१....१३

२६ ऑक्टो...३१...१३.५

२५ ऑक्टो...३०.६...१२.८

२४ ऑक्टो...३०...१२.६

२३ ऑक्टो...३०.२...१३.५

२२ ऑक्टो...३०.१...२१.८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT