Dairy
Dairy  Agrowon
ताज्या बातम्या

Dairy : विदर्भ-मराठवाड्यात दुधाचे संकलन अडीच लाख लिटरवर

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर : ‘‘विदर्भ-मराठवाड्यात दूध उत्पादनाला (Milk Production) चालना देण्यासाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाद्वारे (NDDB) मदर डेअरीच्या (Mother Dairy) सहकार्याने प्रकल्प राबविण्यात आला होता. २०१७ पासून या प्रकल्पाव्दारे दोन्ही विभागांत दूध संकलन (Milk Collection) अडीच लाख लिटरवर पोहोचले,’’ अशी माहिती प्रकल्पाचे समन्वयक रवींद्र ठाकरे यांनी दिली.

विदर्भ-मराठवाड्यात वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शेतीपूरक उद्योगाला चालना देण्याचे धोरण अवलंबण्यात आले. त्या अंतर्गत मदर डेअरीच्या माध्यमातून दुधाळ जनावरांचे संगोपन आणि दूध उत्पादनावर भर देण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून या प्रकल्पाची अंमलबजावणी झाली.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची धुरा ठाकरे यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांनी देखील विदर्भ-मराठवाड्यासाठीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पूर्णपणे झोकून देऊन काम केले. त्याचाच परिपाक म्हणून २०१७ ते आजपर्यंत या दोन्ही विभागांतील दूध संकलन तब्बल अडीच लाख लिटरवर पोहोचले आहे.

‘‘येत्या मार्च २०२३ पर्यंत हे संकलन तीन लाख लिटरवर पोहोचेल,’’ असा विश्वास रवींद्र ठाकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून या प्रकल्पाला निधी देणे बंद करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या निधीसाठी अन्य प्रकल्पाचा विचार केला जात आहे. दुसऱ्या टप्प्यातही या प्रकल्पाची अंमलबजावणी जोरकसपणे केली जाईल. त्यातून सध्याच्या तीन लाख लिटर संकलनावरून पाच लाख लिटरचा टप्पा गाठला जाईल, असे ठाकरे म्हणाले.

‘दूध उत्पादकांसाठी कंपनी स्थापणार’

दूध उत्पादकांसाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाद्वारे शेतकऱ्यांचा सहभाग असलेली कंपनी स्थापन केली जाते. विदर्भ- मराठवाड्यासाठी अशा प्रकारची कंपनी स्थापन केली जाईल. मार्च २०२३ पर्यंत हे काम तडीस जाईल. ‘एनडीडीबी’चे अधिकारी या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राहतात. त्यांच्या नियंत्रणात ही कंपनी राहते. देशभरात आतापर्यंत अशा १८ कंपन्या अस्तित्वात असून ही १९ वी कंपनी असेल, असे ठाकरे म्हणाले.

योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भ व मराठवाडा दोन्ही विभागातील दूध संकलन पाच लाख लिटरपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. तसा प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल.
रवींद्र ठाकरे, विदर्भ-मराठवाडा प्रकल्प समन्वयक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT