बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांच्यावर काळी शाई फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्रकार परिषदेदरम्यान हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर, या सर्व प्रकारानंतर एकमेकांवर खुर्च्याही फेकण्यात आल्या.
एका खाजगी वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कर्नाटकातील शेतकरी नेते के. चंद्रशेखर (K. Chandrashekhar) हे पैसे आंदोलनासाठी पैसे मागत असताना दाखवण्यात आले. याप्रकरणाशी आपला काही संबंध नसलयाचा खुलासा करण्यासाठी टिकैत आणि सिंग यांनी गांधीभवनमध्ये ही पत्रकारपरिषद घेतली.
या परिषदेत बोलताना टिकैत यांनी ,चंद्रशेखर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. याच दरम्यान तिथे हजर असलेल्या लोकांनी गोंधळ करायला सुरुवात केली. त्यानंतर उपस्थित चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी संतप्त होत टिकैत यांच्यावर शाई फेकली.
त्यानंतर एकच गोंधळ उडाला. एवढेच नव्हे तर, घटनेनंतर टिकैत यांचे समर्थक आणि शाईफेक करणाऱ्या गटात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेंकावर खुर्च्या फेकण्यात आल्या. त्यामुळे काहीकाळ येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान शाई फेकणाऱ्या व गोंधळ करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आपल्यावर हल्ला करणारे लोक हे के.चंद्रशेखर (K.Chandrashekhar) यांचे समर्थक असल्याचा आरोप टिकैत यांनी केला. हे कर्नाटक सरकार पोलिसांचे अपयश आहे. स्थानिक पोलिसांनी तिथे कसलीही सुरक्षा व्यवस्था ठेवली नाही, राज्य सरकारच्या संगनमतानेच हा प्रकार घडला असल्याचेही टिकैत म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.