APMC Election Agrowon
ताज्या बातम्या

APMC Election :बाजार समित्यांच्या निवडणुका एप्रिलपूर्वी घ्या

संचालक मंडळाची मुदत संपलेल्या आणि प्रशासकीय राजवट असलेल्या राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका ३० एप्रिलपूर्वी घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सहकार निवडणूक प्राधिकरणाला दिले आहेत.

Team Agrowon

पुणे ः संचालक मंडळाची मुदत संपलेल्या आणि प्रशासकीय राजवट असलेल्या राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका (APMC Election) ३० एप्रिलपूर्वी घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सहकार निवडणूक प्राधिकरणाला दिले आहेत.

तर या निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य शासनाने प्राधिकरणाला सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील न्यायालयाने दिल्या आहेत.

बाजार समित्यांच्या निवडणुकांबाबत विविध न्यायालयांमध्ये विविध याचिका दाखल होत्या. या सर्व याचिकांवर नागपूर खंडपीठाने एकत्रित सुनावणी घेत, ३० एप्रिलपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. अनेक बाजार समित्यांच्या निवडणुका विविध कारणांनी रखडल्या आहेत.

तर अनेक बाजार समित्यांच्या जुन्याच संचालक मंडळाला मुदतवाढ दिली आहे. तर काही बाजार समित्यांवर शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विविध कारणांनी रखडलेल्या निवडणुकांबाबत विविध बाजार समित्या, राजकीय नेते, कार्यकर्ते यांनी विविध न्यायालयांमध्ये याचिका दाखल केल्या होत्या. या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेत, नागपूर खंडपीठाने सर्व निवडणुका घेण्याबाबत ३० एप्रिलची अंतिम मुदत दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT