Pune APMC : न्यायप्रविष्ट पडीक जागेच्या वापरातून उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची जुनी पाण्याची टाकी ते आंबेडकरनगर सीमाभिंत लगतची न्यायप्रविष्ट जागा अनेक वर्षांपासून पडीक आहे. ती जागा डाळिंब यार्डला देऊन उपयोगात आणली जाणार आहे.
Pune APMC | APMC Election
Pune APMC | APMC ElectionAgrowon
Published on
Updated on

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची (Pune APMC) जुनी पाण्याची टाकी ते आंबेडकरनगर सीमाभिंत लगतची न्यायप्रविष्ट जागा अनेक वर्षांपासून पडीक आहे. ती जागा डाळिंब यार्डला (Pomegranate Yard) देऊन उपयोगात आणली जाणार आहे.

या माध्यमातून डाळिंबाच्या उलाढालीच्या बाजार शुल्कमधून समितीला वर्षाला एक कोटी रुपयांचे उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.

मात्र डाळिंब यार्डाच्या माध्यमातून उभारण्यात येणारे शेड अधिकृत, की अनधिकृत असणार याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. बाजार समितीमधील विविध शेड प्रकरणी चौकशी अहवाल प्रलंबित असताना, नव्या शेड उभारणीचा घाट घालण्याचा प्रकार असल्याची चर्चा आहे.

Pune APMC | APMC Election
Pune APMC : पुणे बाजार समितीत सेसचे दैनंदिन ऑनलाइन संकलन

काही डाळिंब अडत्यांनी व्यापारासाठी जागा कमी पडत असल्याचे कारण देत, वाढीव जागेची मागणी केली आहे. या अडत्यांना संबंधित न्यायप्रविष्ट जागेचा निर्णय होईपर्यंत न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून आंबा शेडप्रमाणे हंगामी स्वरूपात भाडेतत्त्वावर मंडप टाकून जागा वापरण्यास देण्यात येणार आहेत.

यामुळे जागेचा दुरुपयोग थांबून बाजार शुल्कामधून बाजार समितीस वार्षिक किमान सुमारे एक कोटी इतके उत्पन्न सुरू होईल, असा दावा बाजार समितीद्वारे करण्यात आला आहे.

बाजार समिती आणि अडते असोसिएशन विस्तारित डाळिंब यार्ड उभारणीचे नियोजन करीत आहे. या नियोजित विस्तारित डाळिंब यार्डामुळे डाळिंब व्यवसायास चालना मिळून पर्यायाने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असे गरड यांनी सांगितले.

Pune APMC | APMC Election
Pune APMC : अडते असोसिएशनच्या बैठकीवरून आयोजनावरून तूं..तूं..मैं...मैं...

मुख्य बाजार आवारातील फळ विभागातील काही डाळिंब अडत्यांना डाळिंब ठेवण्यासाठी सध्याची जागा अपुरी पडत आहे. डाळिंब अडतीवर व्यापार करणाऱ्या अनेक अडत्यांनी बाजार समितीकडे यापूर्वीच जागेची मागणी केलेली होती.

तत्कालीन प्रशासनाने बाजाराच्या दक्षिणेला स्वप्नपूर्ती इमारती समोरील मोकळी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याप्रमाणे आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र त्याचा ठराव अथवा अंमलबजावणी झाली नसल्याचेही गरड यांनी सांगितले.

सध्याच्या न्यायप्रविष्ट जागेवर डुकरे, मोकाट जनावरे यांचे वास्तव्य आहे. तसेच भविष्यात या जागेवर अतिक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिक्रमण होऊ नये आणि जागा बाजार समितीच्या ताब्यात राहावी यासाठी न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून डाळिंब यार्डासाठी जागा देण्याचा प्रस्ताव आहे, यामुळे जागा ताब्यात राहून उत्पन्नात देखील वाढ होणार आहे.

- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

काही अनुत्तरित प्रश्‍न

- शेड बांधकामाला महानगरपालिकेची परवानगी असणार का?

- अनेक अनधिकृत शेड प्रकरणी चौकशी सुरू असताना, नव्या अनधिकृत शेड उभारणीचा घाट कशासाठी आणि कोणासाठी?

- पूर्वीच्या डाळिंब यार्डाच्या अनिधकृत प्रकरणाबाबत प्रश्‍नचिन्ह कायम

- डाळिंब यार्डात केवळ डाळिंब विक्री होणार की लिंबे विक्रीला पण परवानगी देणार?

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com