Agrowon Sanvad Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Crop Production : खरीप पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व्यवस्थापन महत्त्वाचे

Kharif Season 2023 : खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी योग्य व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन अकोला कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ कुलदीप देशमुख यांनी केले.

Team Agrowon

Akola News : खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी योग्य व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन अकोला कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ कुलदीप देशमुख यांनी केले.

रिधोरा (ता. बाळापूर) येथे ‘सकाळ-अॅग्रोवन’ व कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. २६) सायंकाळी कापूस व सोयाबीन पीक व्यवस्थापन विषयावर ‘अॅग्रोवन संवाद’ कार्यक्रम झाला.

या वेळी अध्यक्षस्थानी गावचे सरपंच विशाल दंदी होते. व्यासपीठावर कोरोमंडलचे असिस्टंट जनरल मॅनेजर शिवप्रकाश श्रीवास्तव, विभागीय व्यवसाय समन्वयक उत्कल मंहाता, डेप्युटी मॅनेजर प्रशांत डोणगावकर, कृषी विद्यावेत्ता विजय साखरे, कोरोमंडलचे मुख्य वितरक संजय हिरानंदानी, प्रयोगशील शेतकरी सुधाकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. देशमुख यांनी मार्गदर्शनात सोयाबीन पिकात सुरुवातीपासूनच योग्य खत, कीड व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी लागवडीसोबतची खते, तणनाशकाची योग्य प्रमाणात फवारणी, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर तसेच काढणीनंतर बियाण्यांसाठी सोयाबीन ठेवायची असेल, तर शास्त्रीय पद्धतीनेच हे काम व्हावे, सोयाबीनमध्ये आंतरपीक असेल तर तणनाशकाचा वापर किती करावा, याची सविस्तर माहिती दिली.

शिवप्रकाश श्रीवास्तव यांनी जमीन सुपीकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर तसेच कंपनीच्या उत्पादनांबाबत माहिती दिली. विजय साखरे, मधुकर पटले, सुधाकर देशमुख यांनी माहिती दिली. प्रमोद चौधरी, राजाभाऊ देशमुख, संजय अघडते उपस्थित होते. मनोज अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले.

अकोला सकाळचे वितरण व्यवस्थापक संतोष जुमडे, सकाळचे असिसंस्ट मॅनेजर (जाहिरात आणि सेल्स) विष्णू गावंडे, अॅग्रोवनचे असिसंस्ट मॅनेजर (जाहिरात आणि सेल्स) महेश कोतेगावकर, पत्रकार अनिल दंदी, अॅग्रोवनचे वितरण प्रतिनिधी अनंता शिंदे यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Economy: आली लहर, केला कहर

Maharashtra Farming: शेतकरी : वर्णव्यवस्थेतला तळाचा घटक

Tomato Disease Management: टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण

Wine Industry: ‘वाइन’ भूमी: कॅलिफोर्नियातील नापा व्हॅली

Weekly Weather: राज्यात ईशान्य मॉन्सूनचे आगमन

SCROLL FOR NEXT