Seed Agrowon
ताज्या बातम्या

Mahabeej Seed : ‘महाबीज’ बियाणे खरेदीत गैरप्रकार

Paddy Seed : भात बियाणे खरेदी प्रक्रियेत जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांनी या व्यवहारात मलिदा लाटला असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

Team Agrowon

Palghar News : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून महाबीज भात बियाण्यांच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्य ज्ञानेश्वर ऊर्फ शिवा सांबरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे केली आहे.

भात बियाणे खरेदी प्रक्रियेत जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांनी या व्यवहारात मलिदा लाटला असल्याचा आरोप होऊ लागला आहे. जिल्हा परिषद सदस्य शिवा सांबरे यांनी ही बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणली आहे.

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ५० टक्के अनुदानित भात बियाणे खरेदी प्रक्रियेत बियाणे खरेदी करताना महाबीजकडून अधिकची रकम दखवण्यात आली आहे.

महाबीज कंपनी खासगी दुकानदारांना जर कमी किमतीत बियाणे विकत असेल तर जिल्हा परिषदेला जास्‍त किमतीत विक्री करत आहे असे दिसून आले आहे. तसेच इतर बियाण्यांच्या बाबतीतही हाच प्रकार आढळलेला दिसून येतो, असे सांबरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्‍या निदर्शनास आणून दिले आहे.

त्‍यामुळे शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी राज्य कृषी विभागास पुढील खरेदीत वाजवी दरात भात बियाणे मिळण्याबाबत विनंती करून या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी सांबरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे लेखी पत्राद्वारे केली;

तर यासंदर्भात जिल्हा परिषदेशी संपर्क साधला असता ‘महाबीज’ने दिलेल्या दरपत्रकानुसार खरेदी करण्यात आले आहे. खरेदी केलेल्या बियाण्यांचा तपशील गोळा करण्यात येत असून त्यानंतर निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना वेळेवर भात बियाणे उपलब्ध करून द्यावे, हा जिल्हा परिषदेचा उद्देश असून जास्त दराने खरेदीबाबत तक्रारीची चौकशी केली जाईल.- संदीप पावडे, जिल्हा परिषद कृषी सभापती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wild Vegetables : आरोग्यदायी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व

Manoj Jarange Patil: १० टक्के आरक्षण नको, कायमस्वरूपी आणि हक्काचे आरक्षण हवे; मनोज जरांगे पाटील

Agriculture Department : कृषी विभाग रोज पन्नास हजार शेतकऱ्यांच्या संपर्कात

Reshim Sheti Success : रेशीम शेतीतून विकासाकडे वाटचाल

Turmeric Futures Ban : हळदीच्या वायदेबंदीची मागणी कितपत योग्य?

SCROLL FOR NEXT