Voter List Agrowon
ताज्या बातम्या

मतदार यादी अधिक अचूक करा;जिल्हाधिकारी

मतदार याद्या अचूक असाव्यात. मतदार यादीमध्ये एका मतदारांचे एकापेक्षा अधिक नावे, छायाचित्र असलेली नावे, छायाचित्रे वगळण्यात यावेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील १८ वर्षांवरील प्रत्येक मतदाराची मतदार नोंदणी करण्यात यावी.

Team Agrowon

औरंगाबाद: लोकशाहीला अधिक सुदृढ करण्यासाठी जिल्ह्यातील मतदार यादी अधिक अचूक करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना गुरुवारी (ता.२६) केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मतदार यादीबाबत श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, संजीव मोरे, जनार्दन विधाते, वर्षाराणी भोसले, रामेश्वर रोडगे, संगीता सानप, स्वप्नील मोरे, संदीप पाटील, माणिक आहेर आदींसह सहायक मतदार नोंदणी अधिकारी आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, की मतदार याद्या अचूक असाव्यात. मतदार यादीमध्ये एका मतदारांचे एकापेक्षा अधिक नावे, छायाचित्र असलेली नावे, छायाचित्रे वगळण्यात यावेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील १८ वर्षांवरील प्रत्येक मतदाराची मतदार नोंदणी करण्यात यावी. यामध्ये सर्व महिला, तृतीय पंथीय, दिव्यांगांचा समावेश असावा. त्याचबरोबर मृत मतदार, स्थलांतरित मतदारांची नावेही मतदार यादीतून वगळण्यात यावीत. या मतदार यादीच्या कामास सर्वांनी प्राधान्य द्यावे, अचूकतेवर अधिक लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी सर्व अधिकारी यांना केल्या. जिल्ह्यातील मतदार, मतदार यादीबाबत सविस्तर माहिती डॉ.कदम यांनी जिल्हाधिकारी चव्हाण यांना सादर केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’विरोधात ‘चक्का जाम’

Sugarcane Productivity : ‘हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादकता वाढ’ अभियानास कोल्हापुरात प्रारंभ

Agriculture Irrigation : गतवर्षीच्या तुलनेत सिंचनासाठी १६ टीएमसीने उपसा कमी

SCROLL FOR NEXT