Farmer Loan Waive  Agrowon
ताज्या बातम्या

Karjamukti : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार

Agriculture News : महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेचा दोन लाख रुपयांवरील कर्जदारांना लाभ झालेला नाही, त्यामुळे ते शेतकरी कर्जबाजारीच राहिले आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेचा दोन लाख रुपयांवरील कर्जदारांना लाभ झालेला नाही, त्यामुळे ते शेतकरी कर्जबाजारीच राहिले आहेत. त्यांना कर्जमुक्त करा, अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालून आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा आंबा बागायतदारांनी प्रशासनाला दिला आहे.

जिल्ह्यातील आंबा, काजू आणि भात उत्पादक शेतकरी अर्जुन नाईक, आग्नेल फर्नांडिस, श्यामसुंदर राय, जगन्नाथ गावकर यासह अन्य शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन दिले आहे. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना आणि महात्मा जोतीराव कर्जमुक्ती योजना राबविली.

परंतु या योजनेचा दोन लाखांवर कर्ज असलेल्या आंबा, काजू आणि भात उत्पादक शेतकऱ्यांना कोणताही फायदा झालेला नाही. त्यामुळे हे शेतकरी आजदेखील कर्जबाजारी राहिलेले आहेत. या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, अशी सातत्याने मागणी आम्ही शासनाकडे करीत आहोत. अनेक आंदोलने, उपोषणे आम्ही केली आहेत.

परंतु शासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळालेला नाही, त्यामुळे नाइलाजास्तव आम्हा शेतकऱ्यांना आता वेगळी भूमिका घ्यावी लागणार आहे. शासनाने दोन लाखांवरील कर्जदारांना कर्जमुक्ती जाहीर केली नाही तर भविष्यातील सर्व निवडणुकांवर शेतकरी बहिष्कार घालतील, असा इशाराच निवेदनातून शेतकऱ्यांना प्रशासनाला दिला आहे.

याशिवाय पीकविम्याची रक्कम ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणीदेखील शेतकऱ्यांनी केली आहे. खावटी कर्जधारकांना कर्जमाफी जाहीर केली असली, तरी त्याचा कालावधीत शासनाने ३१ मार्च २०१६ आहे तो २०१७ असा करावा, अशी मागणी निवेदनातून शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT