Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

APMC NEWS : बाजार समित्यांसाठी आराखडा तयार करा

समृद्धी महामार्गालगत उभारण्यात आलेल्या ॲग्रो लॉजिस्टिक पार्कचा विस्तार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

Team Agrowon

Mumbai Bajar Samiti : ‘‘बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांवर भर द्या. त्यासाठी पणन विभागाने सर्वंकष आराखडा तयार करावा, कृषी आणि पणन विभागाने एकत्र काम केले तरच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे या दोन्ही विभागांची एकत्र बैठक तत्काळ घ्या,’’ असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिले.

सह्याद्री अतिथिगृहावर कृषी राज्य पणन मंडळ, ग्राहक महासंघ, पणन महासंघ, वखार महामंडळ आणि कापूस उत्पादक पणन महासंघाच्या कामकाजाचा आढावा शिंदे यांनी घेतला.

शिंदे म्हणाले, ‘‘पणन महासंघाच्या माध्यमातून शेतीमालाला उत्तम भाव देण्यासोबतच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सेंद्रिय खतांच्या निर्मितीला चालना द्या. तसेच शेतीपूरक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याला प्राधान्य द्यावे.’’

या बैठकीत पणन महासंघाने कृषी पणन कायदेविषयक कामकाज, बाजार समित्यांमधील फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा, अन्नधान्याची आवक, बाजार समित्यांचा नफा-तोटा, कृषी प्रक्रिया सहकारी संस्था प्रकल्पांची सद्यःस्थिती, खरेदी विक्री संघांची आर्थिक स्थिती, पणन मंडळाच्या निर्यात केंद्रातून केलेला भाजीपाला निर्यात, मिळालेले उत्पन्न, पणन मंडळाच्या विविध योजना आदींचा आढावा घेण्यात आला.

खतनिर्मिती, कापूस खरेदीची सद्यःस्थिती, वखार महामंडळाचे विविध उपक्रम, महाराष्ट्र स्टेट को- ऑप कन्झ्युमर्स फेडरेशन, मॅग्नेट आदींबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

‘‘काळाची गरज लक्षात घेता बाजार समित्यांचा पुनर्विकास करून तिथे येणारे शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी सोयी-सुविधा तयार करा. पाणी, स्वच्छता, अंतर्गत रस्ते आदी सुविधांची निर्मिती करण्यासाठी आराखडा तयार करा,’’ अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या.

समृद्धी महामार्गालगत उभारण्यात आलेल्या ॲग्रो लॉजिस्टिक पार्कचा विस्तार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसंच यावेळी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, सहसचिव डॉ. सुग्रीव धपाटे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT