Maize Market Agrowon
ताज्या बातम्या

Maize Research Center : सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र

Maize Market Update : जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापण्यासाठी राज्य शासनाने २२.१८ कोटीच्या निधीला मान्यता दिली आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhaji Nagar : जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापण्यासाठी राज्य शासनाने २२.१८ कोटीच्या निधीला मान्यता दिली आहे. मंगळवारी (ता. ३०) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाने अखेर मका संशोधन केंद्राचा मार्ग मोकळा झाला आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मका उत्पादकांची गरज ओळखून या संशोधन केंद्रासाठी विशेष प्रयत्न केले.

सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा व डोईफोडा येथे शासकीय जागेवर हे मका संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. राज्यात मका पीक क्षेत्र सुमारे ११ लाख ४८ हजार हेक्टर असते पिकाची सरासरी उत्पादकता २६ क्विंटल ५९ किलोग्रॅम आहे. मराठवाड्यात मका पिकाखाली सुमारे २ लाख ९९ हजार हेक्टर क्षेत्र असून पिकाची उत्पादकता १९ क्विंटल ९६ किलो प्रति हेक्‍टरी आहे.

महाराष्ट्रात रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामात मका पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. याशिवाय रब्बी व उन्हाळी हंगामात देखील या पिकाचे क्षेत्र वाढते आहे. राज्यातील रब्बी हंगामातील उत्पादकता पुणे व छत्रपती संभाजीनगर विभाग वगळता खरीप हंगामापेक्षा जास्त आहे.

राज्यात सर्वात जास्त मका पिकाखालील क्षेत्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ लाख ३ हजार हेक्टर असून त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यात १ लाख १६ हेक्टर,जळगाव जिल्ह्यात ६९ हजार हेक्टर, बुलडाणा जिल्ह्यात ५४ हजार हेक्टर तर जालना जिल्ह्यात ५६ हजार हेक्टर असून या जिल्ह्यातील मका पिकाची उत्पादकता इतर जिल्ह्यापेक्षा जास्त आहे.

महाराष्ट्रातील एकूण मका पिकाखालील क्षेत्रापैकी ३६ टक्के क्षेत्र व उत्पादनापैकी ३२ टक्के उत्पादन हे मराठवाड्यात होते. यापैकी बहुतांश क्षेत्र हे कोरडवाहू आहे, त्यामुळे मराठवाड्यात मका पिकाच्या वाढीसाठी भरपूर वाव आहे.

छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्हा मका हब म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे सर्व बाबी लक्षात घेऊन मकावर संशोधनासाठी संशोधन केंद्राची गरज पुढे आली.

त्यातूनच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १०८ व्या बैठकीत चर्चा होऊन सिल्लोड तालुक्यातील डोईफोडा व कोटनांद्रा येथे शासकीय जागेवर मका संशोधन केंद्र स्थापण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

सर्व आवश्यक बाबी लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला हा प्रस्ताव जवळपास २५ कोटी ६९ लाख रुपयाचा होता.

या मका संशोधन केंद्रासाठी आवश्यक २१ पदे व बाह्यस्त्रोताद्वारे १८ पदे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या मान्यतेच्या अधीन राहून निर्माण करण्यात, येथील असे मंत्रिमंडळ बैठकीतून स्पष्ट करण्यात आले आहे.

मका पिकाचे स्वतंत्र संशोधन केंद्र निर्माण झाल्याने कीड व रोग प्रतिकारक वाण शोधणे, किडीचे व्यवस्थापन तंत्रज्ञान, बदलत्या हवामानाचा मका पिकावरील कीड रोगावर होणारा परिणाम अभ्यासणे, आदी संशोधन प्रयोग घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे शक्य होणार आहे. ॲग्रोवनने मका संशोधन केंद्राच्या गरजेविषयी तसेच केंद्राची केवळ घोषणा करून उपयोग नाही तर त्यासाठी आवश्यक निधीविषयी पाठपुरावा केला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना ‘अलर्ट’

Raigad Rice Farming: रायगड जिल्ह्यातील भातशेतीला बहर

Krishna River Pollution: कृष्णा नदी दूषित करणाऱ्यांवर कारवाई करणार : डॉ. मैनाक घोष

Sunflower Variety: यंदा रब्बी हंगामात कोरडवाहू सूर्यफुलासाठी कोणते वाण चांगले?

Power Supply Issue: खंडित वीजपुरवठ्याने शिवारात अडचणी; रोहित्रे दुरुस्त करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT