Maize Crop Agrowon
ताज्या बातम्या

Maize Crop Damage : कणसे पडताना वाळतोय मका

जवळपास दीड एकरातील मका कणसे लागण्याच्या वेळी ९० टक्क्यांपेक्षा जास्त वाळून गेली. गेल्या वर्षी अशाप्रकारे मका वाळून जाण्याचे प्रमाण थोडे कमी होते.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : ऐन कणसे पडण्याच्या स्थितीत मक्याचे पीक (maize Crop) वाळून जात आहे. ही बाब सोयगाव तालुक्यातील काही गावांमध्ये प्रकर्षाने पुढे आली आहे. गतवर्षीच्या हंगामात हा प्रकार कमी होता यंदा मात्र त्याची तीव्रता वाढली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बीत घेतलेल्या मका पिकांवर ऐन तुरे पडण्याच्या व कणसे लागण्याच्या अवस्थेत पीक खालून वरच्या दिशेने वाळत आहे.

तिडका येथील शेतकरी संतोष गायकवाड म्हणाले, ‘‘यंदा रब्बीत दोन एकर मका पीक घेतले. त्यापैकी जवळपास दीड एकरातील मका कणसे लागण्याच्या वेळी ९० टक्क्यांपेक्षा जास्त वाळून गेली. गेल्या वर्षी अशाप्रकारे मका वाळून जाण्याचे प्रमाण थोडे कमी होते.

यंदा मात्र जास्त आहे. पाण्याची कमतरता नाही. जमीनही मध्यम आहे. याविषयी कृषी विभागाला माहिती देणार आहे.’’

अंजोळा येथील सोमनाथ तुपे म्हणाले, ‘‘चार एकरांपैकी २५ टक्के मका आत्ताच वाळून गेली आहे. गावातीलच सुभाष दिवटे, भागिनाथ तुपे, गणेश भोसले, राजेंद्र निकम आदींच्याही मक्याची अशीच अवस्था आहे. जमीन भारी, हलकी, मध्यम कशीही असो पीक वाळून जात आहे.’’

सोयगाव तालुक्यातील तिडका, वरठाण, वाकडी, अंजोळा, गोरकुंड, गोंदेगाव आदी गावांतील शेतकऱ्यांची मका कणसे पडण्याच्या अवस्थेत वाळून जात आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव, पाचोरा, चाळीसगाव आदी तालुक्यांतील संपर्कातील शेतकरीही अशाच प्रकारे मका पीक वाळून जात असल्याचे सांगतात. तज्ज्ञांनी प्रत्यक्ष पाहणी करून उपाय सुचवावेत.
ईश्वर पाटील-सपकाळ, शेतकरी, तिडका, ता. सोयगाव
तिडका येथील मका पिकाची अवस्था बघून प्रथमदर्शनी फुलोऱ्यानंतर येणारी मर दिसत आहे. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या विषयी सविस्तर सांगता येईल.
डॉ. दिलीप हिंगोले, वनस्पती रोग शास्त्रज्ञ, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Industry Problems Solution: साखर उद्योगांसमोरील समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी समिती

Grape Pruning: द्राक्ष पट्ट्यात ‘खरड’ छाटणी वेगात

Agri Shop License Suspension: पंधरा खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

Sanjay Gaikwad Controversy: आमदार संजय गायकवाड यांचे विधान विकृत : सपकाळ

Summer Bajra Harvesting: उन्हाळी बाजरी पीक काढणीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT