Solar Power  Agrowon
ताज्या बातम्या

Solar Scheme : ‘सौर कृषी वाहिनी’साठी ‘महावितरण’ घेणार जमीन

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : जिल्ह्यातील कृषी फिडर सौर ऊर्जित करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2.0’ या महत्त्वाकांक्षी योजनेतून नगर जिल्ह्यात २०९ विद्युत उपकेंद्र सौरऊर्जा निर्माण करण्यात येईल. त्यातून २ हजार १४७ मेगावॉट वीजनिर्मित होईल. यासाठी १० हजार ७३६ एकर जमिनीची गरज आहे.

सौर कृषी वाहिनी योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी समिती गठित केलेली आहे. यासंदर्भात नगरला नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, ‘महावितरण’चे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर उपस्थित होते.

शासकीय जमिनी नसलेल्या ठिकाणी खासगी जमिनी भाड्याने घेण्यात येतील. जागेची त्या वर्षीच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किमतीच्या ६ टक्के दरानुसार किंवा प्रतिवर्ष एकरी ५० हजार रुपये भाडेपट्ट्याचा दर निश्‍चित करण्यात आला आहे. प्रथम वर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टी दरावर प्रत्येकी वर्षी ३ टक्के सरळ पद्धतीने वाढ करण्यात येईल.

या विद्युत उपकेंद्र परिसरात हवी जमीन

नेवासा ः घोडेगाव, शिंगणापूर, तेलकुडगाव, करंजगाव, शिरसगाव, खामगाव, गेवराई, नेवासा

पाथर्डी ः येळी, तिसगाव, चिंचपूर इजदे, मिडसांगवी, पाथर्डी, भोसे, हडळवाडी व पाथर्डी

शेवगाव ः घोटन, ढोरजळगाव, खानापूर, खरडगाव, भातकुडगाव, हातगाव, एरंडगाव, दहीफळ

नगर ः देहरे, केडगाव, सावेडी, एल-ब्लॉक, जी-ब्लॉक, भिस्तबाग

पारनेर ः वडझिरे, भाळवणी, पळसपूर

श्रीगोंदा ः पिंपरी कोलंदर, चिंभले, भानगाव, टाकळी कडेवट, अनगरे, श्रीगोंदा, लिंपणगाव, पेडगाव, निमगाव खडू, सालवनदेवी रोड, श्रीगोंदा

जामखेड ः राजुरी, तरडगाव, - कर्जत ः घोगरगाव, आंबे जळगाव, थेरवाडी, राक्षसवाडी, गणेशवाडी अकोले ः अकोले, समशेरपूर, वीरगाव, केळी सांगावी, लिंगदेव, राजूर, ब्राह्मणवाडा, कोहाने, शेंडी, शिलवरे कोपरगाव ः रवांदा, करंजी, तळेगाव मळे, कोकमठाण

राहता ः राहता, निमगाव, पुणतांबा, पोहेगाव, काकडी, शिंगवे, एकरुखे, लोणी, वाकडी, दाढ, हसनापूर, ममदापूर, बाभळेश्‍वर

संगमनेर ः जवळा, चिंचोली गुरव, संगमनेर, पोखरी हवेली, घारगाव, निंबाला, रहिमपूर, वडगाव लांडगा, बोटा, चिखली, मांडवा

राहुरी ः सात्रळ, पाथरे, कोल्हार, देवळाली, आरडगाव, अंबी, टाकळीमिया, कणगर, ब्राह्मणी, बाभूळगाव, राहुरी

श्रीरामपूर ः सूतगिरणी, बेलापूर, भोकर, टाकळीभान, हरेगाव, नायगाव, मातापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season : सांगली जिल्ह्यात पावसामुळे गाळप हंगाम लांबण्याची शक्यता

Crop Damage Compensation : खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड रखडली

Vidhan Sabha Election Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात २१.२४ लाख मतदार

Vidhan Sabha Election Beed : बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात २१ लाखांवर मतदार

SCROLL FOR NEXT