Nagpur News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गड त्यासोबतच फडणवीस, गडकरी यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात आज (ता.१६) महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होणार आहे. या सभेत महाविकास आघाडीचे नेते नेमके कोणते मुद्दे उपस्थित करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची पहिली वज्रमुठ सभा झाली. त्यानंतर आज (ता.१६) नागपुरात महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा होत आहे. या सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत.
महाविकास आघाडीतील सहभागी पक्षाचे प्रत्येकी दोन नेते सभेत मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेतील काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण मार्गदर्शन करतील.
ठाकरे गटाकडून जय्यत तयारी
ठाकरे गटाकडून या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. खासदार संजय राऊत हे गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात तळ ठोकून आहेत. माजी मंत्री सुनील केदार हे या सभेचे समन्वयक आहेत. शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांकडून या सभेचे नियोजन करण्यात आले आहे.
सभेला अटी-शर्तीसह परवानगी
नागपुरातील नंदनवन येथील दर्शन कॉलनी मैदानावर रविवारी सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. या सभेसाठी हे मैदान मिळू नये याकरिता भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जोरदार विरोध केला. धीरज शर्मा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने सभेला परवानगी दिली आहे. पोलिसांनी सभेसाठी काही अटी-शर्ती घातल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.