MLC Election Result
MLC Election Result Agrowon
ताज्या बातम्या

MLC Election Result : शिक्षक, पदवीधर निवडणुकीमध्ये ‘मविआ’ची बाजी

Team Agrowon

Maharashtra Election News मुबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पाचपैकी तीन जागांवर विजय मिळवीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला पराभवाची धूळ चारत महाविकास आघाडीने झेंडा फडवला.

नाशिक पदवीधर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे सत्यजित तांबे यांनी विजय मिळविला असला तरी नवख्या शुभांगी पाटील यांनी घेतलेली मते विचार करायला लावणारी आहेत. तांबे हे विजयानंतर भाजपला अनुकूल अशी भूमिका घेतील, अशी अपेक्षा होती.

मात्र, तसे न झाल्याने भाजपने अनेक ठिकाणी मूखभंग करून घेतल्याचे सिद्ध झाले. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांमध्ये जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा गाजला. हिवाळी अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना कुठल्याही परिस्थितीत सुरू करता येणार नाही.

योजना सुरू केली तर राज्य दिवाळखोरीत निघेल, असे स्पष्ट सांगून टाकले. हेच उत्तर भाजपला अंगलट आले. नागपूर, कोकण, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती या सर्व मतदारसंघांत हा मुद्दा प्रचाराचा अजेंडा होता.

या मुद्द्यावर कोंडी होते असे लक्षात आल्यानंतर औरंगाबादमध्ये प्रचारसभेत फडणवीस यांनी सारवासारव करत जुनी पेन्शन योजना देण्याची धमक केवळ भाजपमध्ये आहे असे सांगून वेळ मारून नेली.

नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सुधाकर आडबाले यांनी १६ हजार ७००, कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी २० हजार ६८३,

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या विक्रम काळे यांनी ६ हजार ९३७, तर पदवीधर मतदारसंघांत अमरावतीमध्ये भाजपच्या रणजित पाटील यांचा पराभव करत धीरज लिंगाडे यांनी तीन हजार ७०० मतांनी बाजी मारली.

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या घोळामुळे लक्षवेधी ठरलेल्या लढतीत तांबे यांनी बाजी मारली. तांबेंनी २९ हजार ४६५ मतांनी विजय मिळविला.

नागपुरात धक्काफडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या शिक्षक मतदारसंघात नागो गाणार यांचा पराभव हा भाजपचा पराभव मानला जातो.

शिक्षक परिषदेने ही जागा निवडली असली तरी गाणार हे विद्यमान आमदार असल्याने त्यांचा पराभव हा भाजपचा पराभव असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसने शेवटच्या क्षणी सुनील केदार यांचे समर्थक सुधाकर आडबले यांना उमेदवारी जाहीर झाली. तरीही आडबले यांनी बाजी मारली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT