Maharashtra Monsoon Update agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Update : घाटमाथ्यावर पुढचे ५ दिवस अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून मोठी अपडेट

Maharashtra Monsoon Update : हवामान खात्याच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात सर्वात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. आयएमडीकडून घेण्यात आलेल्या सॅटेलाईटच्या माध्यमातून काही छायाचित्रे टिपण्यात आले आहेत.

Team Agrowon

Monsoon Update : मागच्या ४ दिवसांपासून पावसाने थोडा जोर धरला असला तरी मुसळधार पावसाचे अद्यापही राज्यात आगमन झाले नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान पश्चिम किनारपट्टीवर पुढील काही तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात सर्वात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. आयएमडीकडून घेण्यात आलेल्या सॅटेलाईटच्या माध्यमातून काही छायाचित्रे टिपण्यात आले आहेत.

यामध्ये पुढचे काही तास घाट माथ्यावर प्रचंड पाऊस होण्याची शक्यता आहे. याबाबत आयएमडी पुणेचे विभागप्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

महाराष्ट्र-केरळ किनारपट्टीवर बाष्पयुक्त ढगांचे डोंगर (Offshore Trough) तयार झाल्याने आगामी पाच दिवस कोकण व गोवा किनारपट्टीला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

यामध्ये कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक या घाटमाथ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात आगामी ४८ तास संततधार राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.

तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या सहा ते सात दिवसांपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मात्र अनेक जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा खूपच कमी आहे.

परंतु राज्यात येत्या काही दिवसात पाऊस सक्रिय राहील, असा अंदाज देखील यापूर्वी डॉ. के. एस. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटवरून वर्तवला होता.

खानदेशात पावसाची हुलकावणी

खानदेशात जोरदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. ढगाळ वातावरण आहे. आकाशात ढगांची गर्दी होते. मात्र, काही वेळेत पाऊस न पडताच ढगांची गर्दी नाहीशी होते. काही ठिकाणी पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. मात्र पेरण्यायोग्य पाऊस झालेला नाही.

खानदेशात गेल्या रविवारपासून ढगाळ वातावरण असून, रिमझिम पाऊस होत आहे. सोमवारी (ता.२६) व मंगळवारी (ता.२७) खानदेशात दुपारच्या वेळी मध्यम पाऊस झाला.

शेतकरी हवालदिल

शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसामुळे खरिपाच्या पेरण्या पूर्णतः खोळंबल्या आहेत. भारतीय हवामान शास्त्र विभागाने २५ जूननंतर पाऊस पडेल, हे स्पष्ट केले. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT