Soybean Seeds Agrowon
ताज्या बातम्या

Mahabeej Kharif Seed Production : ‘महाबीज’चा २४ हजार हेक्टरवर खरीप बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Seed Production : परभणी ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) (Mahabeej) परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, सोलापूर या ६ जिल्ह्यांमध्ये यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात विविध पिकांचा एकूण २४ हजार २०७ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित आहे.

त्यापासून २ लाख ९२ हजार ५१० क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. यंदा ज्यूट बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक डी. डी. कान्हेड यांनी दिली.

‘महाबीज’च्या परभणी विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये दरवर्षी खरीप हंगामात सोयाबीन, मूग, उडीद, तूर आदी पिकांच्या वेगवेगळ्या वाणांचा प्रमाणित व पायाभूत बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम घेण्यात येतो.

यंदाच्या प्रस्तावित बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये एकट्या सोयाबीन पिकांचे क्षेत्र सर्वाधिक २३ हजार २३२ हेक्टर असून, त्यापासून २ लाख ८६ हजार क्विंटल कच्चे बियाणे उत्पादन अपेक्षित आहे.

सोयाबीनच्या प्रस्तावित बीजोत्पादन क्षेत्रामध्ये परभणी जिल्ह्यात ७ हजार २२५ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यांमध्ये ६ हजार १४८ हेक्टर, नांदेड जिल्ह्यांमध्ये १ हजार ७९१ हेक्टर, लातूर जिल्ह्यांमध्ये ४ हजार १७० हेक्टर, धाराशिव जिल्ह्यामध्ये २ हजार ८३० हेक्टर, सोलापूर जिल्ह्यामध्ये ५७५ हेक्टर क्षेत्राचा सामवेश आहे.

यंदा बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये सोयाबीनच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एमएयूएस-६१२, एमएयूएस-१६२, एमएयूएस -१५८, एमएमएयूएस -७१ या वाणांचा समावेश आहे.

इतर वाणांमध्ये जेएस-३३५, डीएस-२२८, फुले संगम, केडीएस ७५३ (फुले किमया) या वाणांचे बीजोत्पादन घेण्यात येणार आहे. तुरीच्या बीएसएमआर-७११, बीडीएन-७१६ या वाणांचे एकूण ७७ हेक्टरवर बीजोत्पादन प्रस्तावित आहे.

उडदाच्या एकेयू १०-१, टीएयू-१ या वाणांचे ४७४ हेक्टरवर तर मुगाच्या उत्कृर्षा, बीएम-२००२-१, बीएम-२००३-२ या वाणांचे १४५ हेक्टरवर बीजोत्पादन प्रस्तावित आहे.

एकूण बीजोत्पादन क्षेत्रानुसार परभणी जिल्ह्यात ९७ हजार १४१ क्विंटल, हिंगोली जिल्ह्यात ७५ हजार ३१६ क्विंटल, नांदेड जिल्ह्यात २२ हजार ६९५ क्विंटल, लातूर जिल्ह्यात ५२ हजार ९९३ क्विंटल, धाराशिव जिल्ह्यात ३६ हजार ४१५ क्विंटल, सोलापूर जिल्ह्यात ७ हजार ९५० क्विंटल कच्चे बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.

ज्यूटचे ९७ हेक्टरवर बीजोत्पादन...
यंदा ज्यूट या पिकाचा बीजोत्पादन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. यंदा परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ज्यूटच्या जेआरओ-५२४ या वाणाचे ९७ हेक्टरवर बीजोत्पादन प्रस्तावित आहे.

गतवर्षी (२०२२) महाबीजकडून ज्यूट बियाण्याला प्रतिक्विंटल ८ हजार रुपये दर देण्यात आला. या वर्षीही शेतकऱ्यांनी ज्यूट, तसेच मूग, उडीद, तूर आदी पिकांचा बीजोत्पादन कार्यक्रम घ्यावा, असे कान्हेड यांनी सांगितले.

जिल्हा, पीकनिहाय खरीप बीजोत्पादन प्रस्तावित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
जिल्हा...सोयाबीन...तूर...मूग...उडीद...इतर...एकूण
परभणी...७७२५... २४...१२८..५०...२०५...८१३२
हिंगोली...६१४८...०००...०००...४०...००...६१८८


नांदेड...१७९१...०००...०००...७२...०००...१८६३
लातूर...४१७०...२५...१७...९९...५०...४३६१


धाराशिव...२८३०...१७...०००...७७...२५...२९४९
सोलापूर...५७५...११...०००...१३५...०००...७२१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Warehouse : गोदामाच्या रचनेनुसार उंचीचे नियोजन

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

SCROLL FOR NEXT