MVA leaders Meets Governor  Agrowon
ताज्या बातम्या

Maratha Arakshan : मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घ्या ; महाविकास आघाडीची राज्यपालांकडे मागणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.

Swapnil Shinde

MVA leaders Meets Governor : राज्यात मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. आरक्षणाच्या प्रश्नांसाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करण्यात आली.

या शिष्टमंडळात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भास्कर जाधव, वर्षा गायकवाड, रवींद्र वायकर, राजेश टोपे, सुनील प्रभू उपस्थित होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू आहे. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे मराठा समाजात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्याचा उद्रेक होऊ लागला आहे. अनेक गावांमध्ये लोकप्रतिनिधींना प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे नेत्यांना मतदारसंघात फिरणे अवघड आहे. हिंसका घटना घडल्यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे आरक्षण आंदोलनात मार्ग काढण्यासाठी राज्यपालांनी पुढाकार घ्यावा, तातडीने विधीमंडळाचे अधिवेशन बोलवावे असे निवेदन देण्यात आले.

काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज विधानभवन परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काॅंग्रेसचे आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani Rainfall Deficit: परभणीत ९५ टक्के खरिपाला फटका

Pune Dams: धरण साखळीतील साठा ९६.८२ टक्क्यांवर

Marathi Literary Conference: दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन तंजावरला होणार

Agriculture PG Admission: केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरी आजपासून पुण्यात सुरू

Maharashtra Rain Forecast: राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT