apmc election
apmc election Agrowon
ताज्या बातम्या

Nagar APMC Election : नगर बाजार समिती निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या असलेल्या नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र निर्माण झाले आहे.

महाविकास आघाडीचे नेते आमदार नीलेश लंके, घनश्याम शेलार, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सध्याचे सत्ताधारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्याविरुद्ध दंड थोपटले आहेत.

नगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वात मोठी असून या बाजार समितीवर सातत्याने माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांची सत्ता आहे. आता या बाजार समितीची निवडणूक होत असल्याने महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात दंड थोपटले आहेत. नगर तालुक्यासह पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील काही गावे या बाजार समितीत येतात.

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक होत असून महाविकास आघाडीचे नेते आमदार नीलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांच्यासह नगर, श्रीगोंदा, पारनेर तालुक्यातील उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत या निवडणुकीमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात उमेदवार उभे करत दंड थोपटले आहेत.

काल( शनिवारी) महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी लंके, तनपुरे यांच्या सर्वच नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाजार समितीच्या माध्यमातून कर्डिले यांच्यावर जोरदार टीका केली. शिवाजी कर्डिले यांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष करण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे यांच्यावरही या कार्यक्रमात लंके यांनी निशाणा साधला.

‘‘आम्ही कशालाही घाबरत नाहीत ईडीवाले हे माझ्याकडे येऊन चौकशी करून गेले येडी वाले ही आम्हाला वैतागले आहेत. त्यामुळे आमच्या कोणीही नादी लागू नये, जशास तसे उत्तर देऊ,’’ असा थेट इशाराच आमदार लंकेंनी बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने दिला. त्यामुळे नगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत वरचेवर चुरस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नीलेश लंकेचा विखे यांच्यावर निशाणा

भाजप खासदार डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्यात आता जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.

लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी असला तरी दोघेही आतापासूनच एकमेकांवर जोरदार टीका करत आहे. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोघे समोरासमोर उभे ठाकले आहेत.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा प्रारंभ करताना आमदार नीलेश लंके यांनी थेट खासदार सुजय विखे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

‘विरोध सुरू केला तर शेवट करतो’, असे शब्द लंके यांनी खासदार विखेंसाठी वापरले. एकप्रकारे लंके यांनी खासदार विखेंना थेट लोकसभा लढविण्यासाठीच चॅलेंज दिल्याचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

SCROLL FOR NEXT