Lumpy Skin Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’चा जनावरे बाजाराला फटका

शेतकरी संभ्रमात; श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर स्वच्छतेला सुरुवात

Team Agrowon

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर भरविण्यात येणाऱ्या जनावरांच्या बाजाराला यंदा लम्पी स्कीन आजाराचा फटका बसणार आहे. बाजार भरविण्यासाठी मंदिर समिती परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. जनावरांचा बाजार भरणार की नाही, या संभ्रमात शेतकरी आहेत.

दरवर्षी रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात जनावर बाजाराने श्री सिद्धेश्वर यात्रेला सुरवात होते. १५ डिसेंबरनंतर येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी जनावर बाजार भरविला जातो. यात्रा काळात सलग दहा दिवस हा बाजार भरलेला असतो. सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातून शेतकरी जनावरे विक्रीसाठी घेऊन येतात. या बाजारामध्ये साधारण चार ते पाच हजार वेगवेगळ्या जातीच्या गायी व म्हशी असतात. सर्वच जातीची, कमीत कमी ते अधिकाधिक दर असलेली जनावरे या बाजारात विक्रीसाठी येतात. जनावर खरेदी-विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल होते.

जनावर विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना कमी मोबदल्यात झुणका-भाकर अशी जेवणाची खास सोय असते. परंतु, यंदा लम्पी आजारामुळे गेल्या तीन महिन्यांपासून गावपातळीवरील जनावर बाजार भरविण्यास शासनाने बंदी केली आहे. त्यामुळे यात्रेपूर्वी भरविण्यात येणाऱ्या जनावर बाजारालाही ब्रेक लागण्याची शक्यता आहे. लम्पी हा आजार गायींना होत असल्याने म्हशींच्या बाजाराला परवानगी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर समिती परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. परंतु, प्रत्यक्षात आज (मंगळवार) पासून बाजार भरणे अपेक्षित होते; तो न भरल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मंदिर स्वच्छतेला वेग

यात्रेला अवघे १५ दिवस शिल्लक राहिले असल्याने श्री सिद्धेश्वर मंदिराची रंगरंगोटी, परिसर स्वच्छता, विद्युत रोषणाई आदी कामांना वेग आला आहे. तर यात्रा काळात भक्तांसाठी दिवसभर सुरू राहणाऱ्या ‘दासोह’साठीच्या तयारीलाही गती आली आहे.

कृषी प्रदर्शनाची थाटणार दालने

तब्बल दोन वर्षांनंतर भव्य स्वरूपात थाटण्यात येणाऱ्या कृषी प्रदर्शनाचे आज (मंगळवारी) भूमिपूजन करण्यात आले. होम मैदानावर पारंपरिक पद्धतीने पूजाविधी करून प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, नीलकंठप्पा कोनापुरे, बाळासाहेब भोगडे, काशिनाथ दर्गो-पाटील, विश्वनाथ लब्बा यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. उद्या (बुधवार) पासून कृषी प्रदर्शनासाठी दालने थाटण्यात येणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT