Rain Forecast Maharashtra agrowon
ताज्या बातम्या

Rain Forecast Maharashtra : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचा मुक्काम

Kolhapur Rain Update : कोकणसह कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत पावसाचा जोर जास्त राहणार आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Rain Update : मागच्या दोन दिवसांपासून अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा तयार झाला आहे. दरम्यान याचा थेट परिणाम राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा मुक्काम राहणारआहे.

प्रामुख्याने कोकणसह कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत पावसाचा जोर जास्त राहणार आहे. मंगळवारनंतर मात्र पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. आगामी ४८ ते ७२ तास राज्यातील बहुतांश भागांत पाऊस राहणार आहे. मात्र, कोकण, मध्य महाराष्ट्रात जोर जास्त राहणार आहे. अरबी समुद्रात वाऱ्यांचा वेग वाढला आहे. ४५ ते ५५ कि.मी. सध्या वारे वाहत असल्याने पश्चिमी वाऱ्याचा जोर वाढला आहे.

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे शहरात मुसळधार

कालपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या ४८ ते ७२ तासांत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहणार आहे.

मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीत प्रामुख्याने सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

कोकणात जोरदार पाऊस

राज्यात जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज (ता. ३०) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर तर विदर्भातील अकोला जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

जोरदार पावसाचा इशारा

राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, अकोला जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे तर विजांसह पावसाचा इशारा पालघर, ठाणे, मुंबई, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशीव, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Viksit Bharat Scheme: तरुणांना १५ रुपये बोनस देणार; १ लाख कोटींची विकासित भारत योजना आजपासून सुरु

Fishing Season : नव्या हंगामात दर्यातून मासळीचे घबाड

Parbhani Crop Insurance : शेतकऱ्यांना ५२ कोटींचा पीकविमा मंजूर

Pm Surya Ghar Yojana : छत्रपती संभाजीनगरमध्ये ५९ मेगावॉट वीज निर्मितीची क्षमता

Agrowon Podcast: हळदीची मागणी वाढली, गहूचा उठाव कायम, उडदाचे भाव दबावात, पेरू व तोंडली स्थिर

SCROLL FOR NEXT