Nana Patole Agrowon
ताज्या बातम्या

Onion Export : कांद्यावरील निर्यातबंदी उठवा: नाना पटोले

भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. भाजप व मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही तर काही मोजक्या उद्योगपतींसाठीच काम करत असल्याचे उघड झाले आहे.

Team Agrowon

Onion Market Update नागपूर : कांद्याला भाव (Onion Rate) नसल्याने हजारो शेतकरी पीक शेतातच कुजवत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कांद्याची निर्यातबंदी (Onion Export Ban) उठवावी, कांद्याला १५०० रुपये हमी द्यावा अथवा क्विंटलला एक हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.

यासंदर्भात टोले म्हणाले, की भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. भाजप व मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही तर काही मोजक्या उद्योगपतींसाठीच काम करत असल्याचे उघड झाले आहे.

उद्योगपतींचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करते पण शेतकऱ्यांना देण्यास भाजप सरकारकडे पैसे नाहीत. सध्या बाजारात कांद्याचे भाव घसरलेले आहेत.

बाजारात कांद्याला ४०० ते ५०० रुपये दर मिळत आहे. या दरातून कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. कांद्याचे घसरलेले भाव पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे.

तर सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. भाजप सरकारच्या काळात कांदा, सोयाबीन, कापूस या मालालाही भाव नाही.

आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आणि त्यात बाजारात पडलेले भाव यात तो पुरता पिचला गेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या ५०० किलो कांद्याला एक रुपया किलोप्रमाणे भाव मिळाला व खर्चाची वजावट करून केवळ २ रुपयांचा धनादेश त्या शेतकऱ्याच्या हातात पडला. ही शेतकऱ्याची क्रूर थट्टा आहे.

पटोले म्हणाले, की मागील वर्षी पुणे जुल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी पत्र पाठवून आत्महत्या केली. विदर्भातही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.

शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे परंतु भाजपला शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कांदा, कापूस, सोयाबीनसह शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे; अन्यथा शेतकऱ्यांच्या आक्रोशाला भाजप सरकारला तोंड द्यावे लागेल, असा इशाराही पटोले यांनी या वेळी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट, अॅव्होकॅडो, मसाला पिकांना ‘एकात्मिक फलोत्पादन’ मधून अनुदान

Jowar Cultivation : अतिवृष्टीमुळे ज्वारीच्या कोठारात हरभरा, करडई

Onion Market : निर्यात धोरणाचा, बाजार हस्तक्षेपाचा कांदा दरावर विपरीत परिणाम

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी तालुकास्तरावर करा

Rabi Season: रब्बी हंगामाला सुरुवात; योग्य मशागतीतून वाढवा उत्पादन!

SCROLL FOR NEXT