Rain Agrowon
ताज्या बातम्या

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित

Sindhudurg Monsoon Latest Update : बावळट-दाणोली (ता. सावंतवाडी) या मार्गावरील पाण्यात बुडालेल्या दोन गाड्यांमधील आठ पर्यटकांना वाचविण्यात यश आले.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्याच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.

पडझडीचे अनेक प्रकार घडले आहेत. बावळट-दाणोली (ता. सावंतवाडी) या मार्गावरील पाण्यात बुडालेल्या दोन गाड्यांमधील आठ पर्यटकांना वाचविण्यात यश आले. पावसाचा जोर कायम राहील्यास गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात मंगळवारपासून (ता. १८) मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात वादळी वारे आणि संततधार सुरू आहे. किनारपट्टीच्या तालुक्यांत वादळी वारा आणि पावसाचा जोर अधिक आहे.

संततधारमुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीचे प्रकार घडले आहेत. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील गावांना पुराचा फटका बसला. या भागातील दुकानवाड, वसोली, वीरवाडी, शिवापूर,चाळोबा या पाच पुलांवरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे या सर्व मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

मालवण-धामापूर-कुडाळ मार्गावरील रवळनाथ मंदिरानजीक पुराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. मालवण-पडवे मार्ग पाण्याखाली गेला.

याशिवाय परूळे मार्गावरदेखील काही ठिकाणी पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळित झाली. वेंगुर्ले तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. सावंतवाडी, देवगड, वैभववाडी, कणकवली तालुक्यांतही जोरदार पाऊस सुरू आहे.

आठ प्रवाशांना वाचवण्यात यश

सावंतवाडी तालुक्यातील बावळट-दाणोली मार्गावरील सरमळे येथे रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटकांच्या दोन गाड्या बुडाल्या. स्थानिकांनी या गाड्यांतील आठ प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला युवक महोत्सवात दोन सुवर्णपदके

Sangli Vote Percentage : मतदानाचा टक्का वाढला; सांगलीत फायदा कोणाला?

Assembly Election Voting : अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभेला मतदानात वाढ

Leopard Terror : अजिंठा डोंगर परिसरात बिबट्यांची दहशत

SCROLL FOR NEXT