Harihareshwar Cooperative Bank Satara agrowon
ताज्या बातम्या

Harihareshwar Cooperative Bank Satara : आरबीआयकडून साताऱ्यातील एका सहकारी बँकेचा परवाना रद्द

Reserve Bank of India : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून महाराष्ट्रातील एक आणि कर्नाटकमधील एक अशा दोन सहकारी बँकांना दणका दिला आहे.

sandeep Shirguppe

Satara News: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून महाराष्ट्रातील एक आणि कर्नाटकमधील एक अशा दोन सहकारी बँकांना दणका दिला आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँक आणि श्री शारदा महिला सहकारी बँक यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. दरम्यान या बँकांकडे भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याचे कारण देत परवाना रद्द केल्याची माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे.

दरम्यान सातारा जिल्ह्यातील वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेने ११ जुलै २०२३ पासून बँकिंग व्यवसाय करणे बंद केल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निवेदनात देण्यात आली आहे. हरिहरेश्वर सहकारी बँकेचे सुमारे ९९.९६ टक्के ठेवीदार त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशननुसार त्यांना मिळणार आहे.

तर श्री शारदा महिला सहकारी बँकेच्या बाबतीत सुमारे ९७.८२ टक्के ठेवीदार त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम DICGC कडून मिळणार आहे. या बँकांचे परवाने रद्द केल्यामुळे ‘बँकिंग’ व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्यात ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे यासह इतर गोष्टींना निर्बंध घालण्यात आले आहेत.

तसेच सध्याची आर्थिक स्थिती पाहाता या बँका त्यांच्या सध्याच्या ठेवीदारांना संपूर्ण पैसे देऊ शकणार नाहीत, असेही आरबीआयने सांगितलं आहे. ८ मार्च २०२३ पर्यंत DICGC ने बँकेच्या एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी ५७.२४ कोटी रुपये आधीच दिली आहे.

१२ जून २०१३ पर्यंत, DICGC ने श्री शारदा महिला सहकारी बँकेच्या ठेवीदारांना एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी १५.०६ कोटी रुपये आधीच दिल्याची माहिती समोर आली आहे.

सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक, महाराष्ट्र यांनादेखील सदर बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्याची आणि बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे, असे आरबीआयने पुढे नमूद केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT