Drone technology for agricultural planning 
ताज्या बातम्या

Drone Technology : महिलांनी गिरविले ड्रोन हाताळण्याचे धडे

पोखराअंतर्गत सेलू येथे ट्रॅक्‍टर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

Team Agrowon

वर्धा ः ‘‘शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढते असले तरी यंत्र हाताळण्यासंबंधीचे ज्ञान नसेल तर अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने यंत्रासंबंधीचे बारकावे जाणून घेतले पाहिजे,’’ असे आवाहन सेलू तालुका कृषी अधिकारी अतुल जाधव यांनी केले. नाबार्ड (NABARD) व कृषी विभाग (Agriculture Department) यांच्या संयुक्‍त सहकार्याने पोखराअंतर्गत समुहातील महिलांसाठी आयोजित ट्रॅक्‍टर प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

दहेगाव गोसावी येथे आयोजित या कार्यशाळेला सरपंच संदीप वाणी, अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक वैभव लहाने, केव्हीके प्रमुख डॉ. जीवन कतोरे, राहुल अतकरे, आबासाहेब रूपणार, शिवलीला खराटे, मंडळ कृषी अधिकारी रवींद्र राऊत, प्रशांत साठे, धर्मेंद्र चव्हाण, एच.व्ही. भालके, बेबीताई चौधरी, रंजना ढाकरे, उमेद अभियानाच्या सरिता इंगोले यांची उपस्थिती होती.

अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक लहाने यांनी शेतकरी समूहांसाठी असलेल्या विविध कर्ज योजनांची माहिती दिली. डॉ. जीवन कतोरे यांनी शेतीक्षेत्रातील यांत्रिकीकरण तसेच फवारणीकामी ड्रोनचा तंत्रशुद्ध वापर याविषयी मार्गदर्शन केले. अतुल जाधव यांनी पोखराअंतर्गत असलेल्या यांत्रिकीकरण तसेच इतर योजनांविषयी सांगितले. प्रशांत साठे यांनी देखील पोखरातील योजनांचा समूहांना होणारा लाभ याविषयी माहिती दिली. या कार्यशाळेत प्रशिक्षक असलेल्या धर्मेंद्र चव्हाण यांनी ड्रोन चालविण्याचे तर राजेश सोनोने यांनी ट्रॅक्‍टर चालविण्याचे प्रशिक्षण महिलांना दिले. सूत्रसंचालन प्रशांत साठे यांनी केले तर रंजना ढाकरे यांनी आभार मानले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा पार पडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur MSP Procurement: हमीभावाने खरेदीसाठी तूर नोंदणीला सुरुवात

Weather Update: ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता

Fertiliser Import: यंदा खत आयात ७६ टक्क्यांनी वाढणार, खर्च विक्रमी १८ अब्ज डॉलर्सवर?

Ativrushti Madat : गुजरात सरकारने ३२ लाख अतिवृष्टीबाधितांना वितरीत केले ९ हजार ४६६ कोटी रुपये; कृषिमंत्री वाघानी यांचा दावा

Cash Crops: नगदी पिकांकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT