Weather Update
Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : ढगाळ हवामानामुळे गारठा कमी

टीम ॲग्रोवन

पुणे : अरबी समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान (Cloudy Weather) होत आहे. यातच उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या (Cold Wind) अभावामुळे राज्यात गारठा (Cold weather) कमी झाला आहे. दुपारी उन्हाचा (Heat) चटका वाढला असून, उकाड्यात वाढ झाली आहे. दक्षिण कोकण, गोव्यासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या कमाल, किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आग्नेय अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत असून, या वाऱ्यामुळे समुद्रावरील बाष्पयुक्त वारे कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाड्याकडे येत आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामान झाले आहे. दक्षिण कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढण्याबरोबरच गारठा कमी झाला आहे.

उत्तर अंदमान समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. दरम्यान उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी कायम असून, राजस्थानमधील चुरू येथे रविवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भातील गोंदिया येथे राज्यातील नीचांकी ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा ११ ते २३ अंशांच्या दरम्यान आहे. तर कमाल तापमानात वाढ झाली असून, बहुतांशी ठिकाणी ३१ ते ३५ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भाच्या उत्तरेकडील भागात गारठा कायम आहे. उर्वरित राज्यात आज (ता. २८) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२ (१८.१), जळगाव ३१.५ (१२.७), धुळे ३१ (१०.५), कोल्हापूर ३१.६ (२३.२), महाबळेश्वर २५.४(१६.७), नाशिक ३१.२ (१४.६), निफाड ३१.१ (१३), सांगली ३२.६(२२.४), सातारा २७.६(२१.४), सोलापूर ३४.५ (१९.४), सांताक्रूझ ३४.३(२२.५), डहाणू ३१.४ (२०.६), रत्नागिरी ३४.३ (२३.३), औरंगाबाद ३०.६ (१३), नांदेड ३१.२ (१५.८), उस्मानाबाद - (१६.९), परभणी ३०.५ (१४.५), अकोला ३२.४ (१४.९), अमरावती ३०.२ (१२.७), बुलडाणा २९.५ (१४.२), ब्रह्मपुरी ३१.८ (१३.१), चंद्रपूर २७.२ (१४), गडचिरोली २९(१२.६), गोंदिया २८.४(९.८), नागपूर २९.४ (११.२), वर्धा ३०.५(१२.४), यवतमाळ ३१.० (११).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT