Water Bori Project Agrowon
ताज्या बातम्या

Irrigation Project : बोरीतून सिंचनासाठी तीन, पिण्यासाठी एक आवर्तन सोडा’

तालुक्यातील बोरी प्रकल्पाच्या कालव्याद्वारे सिंचनासाठी तीन आवर्तन तसेच उन्हाळ्यात उजव्या व डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी एक आवर्तन देण्याच्या सूचना आमदार चिमणराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Team Agrowon

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील बोरी प्रकल्पाच्या (Irrigation Project) कालव्याद्वारे सिंचनासाठी (Water Project) तीन आवर्तन तसेच उन्हाळ्यात उजव्या व डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी एक आवर्तन देण्याच्या सूचना आमदार चिमणराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

येथील बोरी वसाहत येथे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार पाटील यांनी बोरी प्रकल्पाच्या कालव्याच्या पाण्याच्या संदर्भात योग्य नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

या वेळी बोरी मध्यम प्रकल्पाचे रब्बी हंगाम २०२२ -२०२३ व उन्हाळी बिगर सिंचन कालव्याद्वारे पाणी देण्याबाबत आवर्तन भोकरबारी मध्यम प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी कालव्याद्वारे सिंचनाचे दोन आवर्तन देण्याचे ठरविण्यात आले. शेतकऱ्यांनी पाणी अर्ज लवकरात लवकर भरून सिंचन पाणीपट्टी भरण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभागाचे प्रमुख डी. पी. अग्रवाल यांनी केले.

या वेळी बोरी मध्यम प्रकल्पाचे रब्बी हंगाम २०२२ -२०२३ व उन्हाळी बिगर सिंचन कालव्याद्वारे पाणी देण्याबाबत आवर्तन भोकरबारी मध्यम प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी कालव्याद्वारे सिंचनाचे दोन आवर्तन देण्याचे ठरविण्यात आले. शेतकऱ्यांनी पाणी अर्ज लवकरात लवकर भरून सिंचन पाणीपट्टी भरण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभागाचे प्रमुख डी. पी. अग्रवाल यांनी केले.

याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे एस. पी .चव्हाण, उपविभागीय अभियंता एस. ओ. पवार, शाखा अधिकारी पी. जे. काकडे, अजिंक्य पाटील, कालवा सल्लागार समिती सदस्य मनोहर पाटील, राजाराम पाटील, भैय्यासाहेब पाटील, कालवा निरीक्षक नाना पाटील, शशिकांत ठाकरे, अतुल पाटील, पाटबंधारेचे कर्मचारी तसेच लाभधारक शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही.एम. पाटील यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर वाढणार; पाच दिवस कोणत्या भागात पाऊस?

Drought Declaration Demands: दुष्काळ जाहीर करण्यासाठी आक्रोश अग्नितांडव आंदोलन

Soybean Crop Loss: सोयाबीनमधून यंदा खर्च निघण्याचीही शक्यता धूसर

Maharashtra Drought: दुष्काळ परिस्थितीवर उपाययोजना सुरु, शेतकऱ्यांना सरसकट मदत देणार- मुख्यमंत्री फडणवीस

Maharashtra Drought Crisis: कुंभमेळ्यावरील अनावश्यक खर्च दुष्काळासाठी वळवा: संजय राऊत

SCROLL FOR NEXT