Land Survey Agrowon
ताज्या बातम्या

Land Survey : लवकरच जमीन मोजणी, अधिकारी नियुक्ती होणार

‘निम्न दुधना’ प्रकल्प बाधितांच्या मागणी नुसार वरिष्ठ कार्यालकडून दोन निवृत्त शाखा अभियंत्यांची बाहयस्त्रोतामार्फत नियुक्ती देण्यात येईल.

Team Agrowon

औरंगाबाद : ‘निम्न दुधना’ प्रकल्प (Nimna Dudhana Project) बाधितांच्या मागणी नुसार वरिष्ठ कार्यालकडून दोन निवृत्त शाखा अभियंत्यांची बाहयस्त्रोतामार्फत नियुक्ती देण्यात येईल. शासनास सादर करावयाचे इएसआयए एक्सपान्शनचे पत्र जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले आहे. त्यामुळे लवकरच जमीन मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन प्रशासनाने दिले. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्प बाधितांनी ठिय्या आंदोलन मंगळवारी (ता. २२) मागे घेतले.

शेतकऱ्यांचे भूसिमांकन टाकणे व अधिकारी देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील वांजोळा येथील निम्न दुधना प्रकल्प बाधित शेतकरी पुन्हा एकदा जायकवाडी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयासमोर सोमवारपासून (ता. २१) बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसले होते. शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, वांजोळा या शिवारात २०१६ पासून निम्न दुधना प्रकल्प ६६ टक्के भरला की पाणी येते. आजच्या घडीला सात वर्ष होत आले अशीच स्थिती आहे.

न्यायालयानेही नऊ महिन्यांत भूसंपादन करा, असे आदेश दिले. परंतु तरी काहीच कार्यवाही नाही. पाटबंधारे प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीत चुकीच्या पद्धतीने सात वर्षांपासून पाणी घातले. त्यामुळे आम्हाला कर्जबाजारी करून देशोधडीला लावले. भूमिहीन केले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. भुसंपादनचा प्रश्न रेंगाळल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही शेतकऱ्यांनी निवेदनातून स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Elections Result: मतदारांचा कौल कुणाला?; मतमोजणीला सुरुवात

Modi Epstein Controversy: नरेंद्र मोदी आणि एपस्टीन यांचे नाते काय?: चव्हाण

MFOI Award 2025: अमृतालयम ‘एफपीओ’ ला राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार

Birth Records: दीड हजार लोकवस्तीच्या गावात २७ हजार जन्म नोंदी

Farmer Issue: ‘जाचक अटी दूर करून कापूस, सोयाबीन खरेदी करा’

SCROLL FOR NEXT