Rice Harvesting
Rice Harvesting Agrowon
ताज्या बातम्या

Rice Harvesting : पेणमध्ये भात कापणीसाठी मजूर मिळेनात

टीम ॲग्रोवन

पेण : तालुक्यात औद्योगिकरण (Industrialization) मोठ्या प्रमाणात वाढले असून अनेक शेतकरी अथवा शेतमजूर कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. परिणामी भात कापण्यास मजुरांची (Agricultural Labor) कमतरता भासत असून त्यांचा भाव वधारला आहे.

रब्बी हंगामात घेतले जाणारे दुबार भातपीक, कडधान्य शेती, भाजीपाला लागवडीसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. मेहनत अधिक, त्‍या तुलनेत उत्‍पादन कमी मिळत असल्‍याने तरुण वर्ग शेतीऐवजी कंपन्यांमध्ये रोजगार शोधत आहेत. त्यामुळे हजारे एकर शेती पडीक झाली असून त्‍याचा फटका शेती उत्‍पादनाला बसतो आहे.

या पूर्वी भात शेती कापण्यासाठी तालुक्यातील डोंगराळ भागातील आदिवासी समाजातील मजूर मोठ्या संख्येने मिळायचे, मात्र हाच कामगार आता तालुक्यात अनेक कंपन्यांमध्ये कंटात्री पद्धतीने काम करू लागला आहे; तर काही पनवेल, नवी मुंबई, ठाणे आदी ठिकाणी नोकरी-व्यवसायानिमित्त जात आहेत.

तरुण वर्गाची नोकरीला अधिक पसंती मिळू लागल्‍याने तो शेती व्यवसायापासून दुरावत आहे‌. त्‍यामुळे परंपरागत शेती सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्याच घरातील मंडळींना घेऊन शेतावर काबाडकष्ट करावे लागतात.

भात कापणीसाठी ५०० ते ६०० रुपये मजुरी देऊनही शेतमजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. भातशेतीची कामे केली नाहीत तर कापणीला आलेल्या पिकाची नासाडी होण्याची परिणामी उत्‍पन्नावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने मजुरांची मनधरणी करून मागेल ती मजुरी, शिवाय नाश्‍ता, जेवणाची सोय, येण्या-जाण्याचा खर्च द्यावा लागतो.

हस्त नक्षत्र संपताच शेतकरी भात कापणीला व झोडणीला सुरुवात करतो, मात्र सध्या परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असल्‍याने कापणीला विलंब होत आहे. येत्या काही दिवसांत कापणीचा हंगाम सुरू होणार असल्याने आतापासूनच शेतकरी मजुरांच्या शोधात आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT