बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग (Samrudhhi Mahamarg) जिल्ह्यातून ८९ किलोमीटर गेला आहे. या महामार्गावर साब्रा-काब्रा आणि सावरगाव माळ या दोन कृषिसमृद्धी (Krushi Samrudhhi) नवनगरांची निर्मिती केली जाणार आहे. यात तब्बल साडेसहा हजार शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग राहणार आहे. त्यामुळे कृषी विकासासह पर्यटनालाही (Tourism) चालना मिळण्याची आशा आहे.
जिल्ह्यात मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा या चार तालुक्यांतून हा महामार्ग गेला आहे. या महामार्गावर मेहकर तालुक्यातील साब्रा-काब्रा तर सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ अशी दोन कृषिसमृद्धी नगरे प्रस्तावित आहेत.
साब्रा-काब्रा येथील नवनगरामध्ये साब्रा, काब्रा, भुमरा, फैजलापूर, गौंढाळा पाच गावांचा समावेश राहील. यात सुमारे ४ हजार शेतकरी सहभागी होतील. यासाठी एक हजार ३४८ हेक्टर भूसंपादन केले आहे. सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा तालुक्यांतील सावरगावमाळ, गोळेगाव, निमखेड सावरगाव माळ या नवनगरांमध्ये समाविष्ट राहील. यात सुमारे अडीच हजार शेतकरी सहभागी होतील. यासाठी सुमारे १९४६ हेक्टर जमीन संपादित केली आहे.
जिल्ह्यात समृद्धी महामार्ग दोन पॅकेजमध्ये पूर्ण केला आहे. जिल्हा मुख्यालयापासून हा महामार्ग ७५ किलोमीटरवर, लोणार सरोवर केवळ १८ किलोमीटरवर, तर संतनगरी शेगाव ७४ किलोमीटरवर आहे. महामार्गाला मेहकर येथील फर्दापूर आणि देऊळगाव येथे दोन इंटरचेंज देण्यात आले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.