Koyna Dam : राज्याची भाग्यलक्ष्मी म्हणून समजल्या जाणाऱ्या कोयना धरण अद्यापही भरले पूर्ण क्षमतेने भरले नाही. दरम्यान सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये भविष्यात पाणी संकट येण्याची शक्यता आहे. दरम्यान मागच्या महिन्यभरात पाऊस कमी झाल्याने धरणे कधी भरणार असा प्रश्न शेतकर्यांसह सर्वानाच पडला आहे.
मागच्या वर्षी कोयना धरण ऑगस्टमध्येच धरणात ९४.३५ टक्के भरले होते परंतु यंदा ९० टक्क्यांवर धरणसाठा जाताना तारांबळ उडत आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान सातारा जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर व जावळी या तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस चांगला झाला. परंतु यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. तर सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, खंडाळा व कोरेगाव या तालुक्यातील पूर्व भागात पावसाअभावी पिके करपू लागली आहेत तर पशुपालकांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
दरवर्षी १५ ऑगस्टपूर्वी जवळपास धरणे ९० टक्क्यांवर जात असतात तर १५ ऑगस्टनंतर नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येते. मात्र पावसानेच उघडीप दिल्याने धरणे भरणार कधी असे कोडे पडले आहे. नदी, नाले, ओढे, तलाव, बंधारे पाण्याअभावी कोरडे ठणठणीत पडले आहेत. तसेच दिवसेंदिवस भूजल पातळीही खालावत चालली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न ऐन पावसाळ्यात ऐरणीवर आला आहे.
कोयना धरणात सध्या ८६ टक्के पाणीसाठी आहे तर मागच्या वर्षी तो ९५ टक्क्यांवर होता. धोम धरणात आज गतवर्षीपेक्षा १४ टक्के पाणीसाठा कमी आहे. धरणात ८१.९५ टक्के आजचा पाणीसाठा आहे. धोम बलकवडी धरणात आज गतवर्षीपेक्षा ४.७२ टक्के पाणीसाठा जास्त आहे. धरणात ९६.७२ टक्के आजचा पाणीसाठा आहे.
कण्हेर धरणात गतवर्षीपेक्षा १३.०१ टक्के पाणीसाठा कमी आहे. धरणात ८०.०८ टक्के आजचा पाणीसाठा आहे. उरमोडी धरणात गतवर्षीपेक्षा ३७ टक्के पाणीसाठा कमी आहे. धरणात ५९.७९ टक्के आजचा पाणीसाठा आहे. तारळी धरणात गतवर्षीपेक्षा २.३४ टक्के पाणीसाठा कमी आहे. धरणात ९१.१० टक्के आजचा पाणीसाठा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.