Kolhapur Shetkari Sangh agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Shetkari Sangh : जिल्हाधिकारी चले जाव; शेतकरी संघाच्या समर्थनात फलकबाजी, सभासद संतप्त

Minister Deepak Keasarkar : कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याविरोधात आरोप करण्यात आले आहेत.

sandeep Shirguppe

Kolhapur Shetkari Sangh : कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी मागच्या चार दिवसांपूर्वी अंबाबाई मंदीर परिसरात असलेल्या शेतकरी संघाच्या इमारतीमधील तीन मजले देवस्थान समितीने ताब्यात घेण्याचे आदेश दिले. यावरून शेतकरी संघातील सभासद आणि कोल्हापूर शहरातील सर्वपक्षियांनी विरोध केला होता. दरम्यान कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याविरोधात आरोप करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात संघाच्या सभासदांनी आज (ता.२७) बुधवार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शेतकरी संघातील सभासदांसह सर्वपक्षीय नेते देखील सहभागी झाले होते.

सहकार मोडीत काढणाऱ्या राज्यशासनाचा धिक्कार असो, वाचवा वाचवा, सहकार वाचवा, जिल्हाधिकारी चले जाव यासह शेतकरी संघाच्या समर्थनात फलक हाती घेत मोठ्या संख्येने सभासद मोर्चात सहभागी होते.

हा मोर्चा भवानी मंडपापासून ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार, विजय देवणे, रविकीरण इंगवले, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनिल माने, यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकरी संघाच्या इमारतीचे अधिग्रहण तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आले आहे. त्याद्वारे मालकी बदलता येत नाही. शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचविण्याचा उद्देश देवस्थान समितीचा नाही. राजर्षी शाहू महाराजांच्या लोककल्याणकारी मार्गावरच प्रशासन सदैव मार्गक्रमण करत राहील तरी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी केले आहे.

शेतकरी सहकारी संघाची जागा ताब्यात घेतली नाहीतर त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दरोडा टाकला असून जिल्ह्यात आता कोणती आपत्ती आली म्हणून एवढ्या तातडीने जागा ताब्यात घेतली? असा सवाल करत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आडून पालकमंत्री दीपक केसरकर यांना ही जागा बळकावयाची आहे. असा आरोपही करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT