Kolhapur Guardian Minister agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Flood : कोल्हापूरात पालकमंत्र्यांनी पूर परिस्थितीचा घेतला आढावा, शाळा सुरू करण्याबाबत दिल्या सूचना

Kolhapur Guardian Minister : जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पूरस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक संपन्न झाली.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याच्या भितीने शाळांना सुट्टी देण्यात आली होती. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेने अनेक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले होते. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून तालुक्यांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी काही सूचना केल्या ते म्हणाले की, स्थलांतरित झालेल्या नागरिकांना उद्या सकाळपासून घरी जाण्यास सांगण्यात आले आहे. उद्या पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज हवामान खात्याने दिला पण पंचगंगा नदीची पाणी पातळी एक-एक इंचाने वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून जाऊ नये असे आवाहन दिपक केसरकर यांनी केले.

उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळा पूर्ववत सुरू होतील. मुलांच्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी वेगळी तारीख देण्यात येईल. मुलांच्या परीक्षेवर, अभ्यासावर कोणताही परिणाम होणार नाही. ज्या जिल्ह्यांमधील आज शाळांमधील परीक्षा रद्द करण्यात आली आहे, त्यांना नवीन तारखा देण्यात येतील. धोकादायक इमारतींवर तातडीने कारवाई सुरु करण्यात येईल, जिल्ह्यात पावसाच्या दुर्घटनेत दोन बळी गेले असून त्यांना शासकीय मदत करणार असल्याचेही केसरकर यांनी माहिती दिली.

तसेच बालिंगा पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्याबाबत केसरकर यांनी सूचना केल्या. भोगावती नदीत पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने जुना असलेल्या बालिंगा पुलावरून प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता वाहतूक बंद करण्यात आली होती. वाहतूक बंद केल्यापासून करवीर तालुक्याच्या पश्चिमेसह गगनबावडा तसेच पुढे कोकणात जाणाऱ्या वाहतुकीला प्रचंड फटका बसला.

पादचाऱ्यांनाही वाहतूक बंद करण्यात आल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर हलक्या व दुचाकी वाहनांना बालिंगा पुलावरून वाहतूक सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याने साबळेवाडी फाटा व बालिंगाजवळ लावण्यात आलेली बॅरिकेट्स हटवून वाहतूक सुरू करण्यात यावी असे केसरकर यांनी सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT